Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा दणका; निवडणूक लढवण्यास बंदी

Last Updated:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोलोरॅडो न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना आता सहभागी होता येणार नाही.

News18
News18
दिल्ली, 20 डिसेंबर : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोलोरॅडो न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प सहभागी होऊ शकणार नाहीत, कोर्टाने निवडणूक लढवण्याकरता त्यांच्यावर बंदी घातली आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर ट्रम्प यांचं नाव रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदान प्रक्रियेतूनही वगळण्यात यावं असे आदेश न्यायालयानं राज्य सचिवांना दिले आहेत.
रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. मात्र याचदरम्यान न्यायालयानं आता ट्रम्प यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घातल्यामुळे हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकेच्या घटनात्मक तरतुदीनुसार ट्रम्प यांना राज्यात मतदान करण्यापासून रोखण्यात यावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
कोलोरॅडो न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प हे राज्यघटनेच्या चौदावी घटनादुरुस्ती कलम तीन अंतर्गत राष्ट्राध्यक्ष होण्यास अपात्र आहेत. त्यामुळे ते निवडणूक लढवू शकत नाहीत. एवढंच नाही तर ट्रम्प यांचं नाव रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदान प्रक्रियेतूनही वगळण्यात यावं असे आदेश न्यायालयानं राज्य सचिवांना दिले आहेत.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा दणका; निवडणूक लढवण्यास बंदी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement