Hassan Nasrallah Killed : इस्त्रायलच्या सैन्याने केला हिजबुल्ला प्रमुखाचा खात्मा; जगभरात खळबळ!

Last Updated:

Israel confirms Hassan Nasrallah Death : हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह याचा इस्त्रायलच्या सैन्याने खात्या केल्याची मोठी वृत्त समोर येत आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशिव यांनी याची अधिकृत माहिती दिली.

Hassan Nasrallah Killed Israel
Hassan Nasrallah Killed Israel
Hassan Nasrallah Killed : हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह याचा इस्त्रायलच्या सैन्याने खात्या केल्याची मोठी वृत्त समोर येत आहे. सध्या इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान ही माहिती समोर आलीये. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) चे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशिव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची घोषणा केली. लष्कराच्या प्रवक्त्यानेही एएफपी या वृत्तसंस्थेला हिजबुल्लाचा नेता शेख हसन नसरल्लाहच्या हत्येची पुष्टी केली. त्यामुळे आता जगभरात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलच्या सुरक्षा रक्षक दलाने शुक्रवारी रात्री उत्तर-पूर्व लेबनॉनच्या बेका व्हॅली भागात हल्ला केला. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भागातच हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह लपला होता. गुप्तचर विभागाच्या या इनपुटच्या आधारे इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी थेट हिजबुल्लाच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं अन् यामध्ये हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.
advertisement
कोण होता शेख हसन नसरल्लाह?
शेख हसन नसरल्लाह हा लेबनॉनचा प्रसिद्ध शिया धर्मगुरू आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा नेता होता. 1975 पासून शेख हसन नसरल्लाह दहशतवादी संघटनेत काम करत होता. शेख हसन नसरल्लाह याचे वडील अब्दुल करीम एक छोटेसे दुकान चालवायचे. नसराल्ला नऊ भाऊ आणि बहिणींमध्ये सर्वात मोठा होता. वयाच्या 32 व्या वर्षी हिजबुल्लाहची कमान हाती घेतली होती.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Hassan Nasrallah Killed : इस्त्रायलच्या सैन्याने केला हिजबुल्ला प्रमुखाचा खात्मा; जगभरात खळबळ!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement