भारत महाशक्ती बनण्याच्या जवळ, आपण भीक मागतोय; पाकिस्तानी नेत्यांचा संसदेतच हल्लाबोल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी भीक मागावी लागत असल्याचं वक्तव्य नेत्याने संसदेत केलंय.
कराची : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये आता त्यांच्याच नेत्याने संसदेतच घरचा आहेर दिला. पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी भीक मागावी लागत असल्याचं वक्तव्य नेत्याने संसदेत केलंय. पाकिस्तानचे मुस्लिम नेते मौलाना फजलुर रहमान यांनी सांगितलं की, एका बाजूला भारत जागतिक महाशक्ती बनण्याच्या जवळ पोहोचत आहे तर पाकिस्तान जगात स्वत:ला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी भीक मागत आहे.
मौलाना फजलुर रहमान हे सोमवारी त्यांच्या आधीचे प्रतिस्पर्धी पीटीआयच्या समर्थनात बोलत होते. त्यांनी म्हटलं की, विरोधी पक्षांना रॅली आयोजित करण्याचा आणि सरकार बनवण्याचाही अधिकार आहे. जमीयत उमेला ए इस्लाम फजलच्या त्यांच्या गटाचे प्रमुख रहमान यांनी पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीत सोमवारी जोरदार भाषण केलं. राजकीय व्यवस्थेत हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे.
मौलाना फजलुर रहमान म्हणाले की, रॅली करणं हा पीटीआयचा अधिकार आहे. आम्ही २०१८ च्या निवडणुकीवरही आक्षेप घेतला होता आणि या निवडणुकीवरही आक्षेप आहे. जर २०१८ च्या निवडणुकीत हेराफेरी झाली होती तर सध्याच्या निवडणुकीत झाली नाही कशावरून? असा प्रश्न त्यांनी विचारला. पीटीआयचे नेते असद कैसर यांची मागणी योग्य आहे आणि रॅली आयोजित करण्याचा पीटीआयचा अधिकार असल्याचं रहमान म्हणाले.
advertisement
रहामन यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टीच्या सत्ताधारी आघाडीला विनंती केली की संसदेत बहुमत आहे तर पीटीआयला सरकार बनवण्याची परवानगी द्यावी. ते म्हणाले की, सत्ता सोडा आणि इकडे विरोधी बाकांवर येऊन बसा. जर पीटीआयकडे बहुमत आहे तर त्यांना सरकार द्यावं. मौलवी रहामन यांनी निवडणूक आणि देश चालवण्यात सरकारी संस्था आणि नोकरशहांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 30, 2024 11:02 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
भारत महाशक्ती बनण्याच्या जवळ, आपण भीक मागतोय; पाकिस्तानी नेत्यांचा संसदेतच हल्लाबोल


