थरथरणारं शरीर, उठायचीही हिंमत नाही; मुंबईकरांचं रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्याचा भयावह अंत

Last Updated:

Abdul Rehman Makki Death: मुंबईचे रस्ते रक्ताने लाल करणाऱ्या 26/11 चा गुन्हेगार अब्दुल रहमान मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: मुंबईचे रस्ते रक्ताने लाल करणाऱ्या 26/11 चा गुन्हेगार अब्दुल रहमान मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. लष्कर ए तैबाचा उपप्रमुख असण्यासोबतच तो या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदचा मेहुणाही होता. मक्कीनेच मुंबई हल्ल्याचा कट रचला होता. हा हल्ला करण्यातही त्याचा मोठा वाटा होता. मुंबईच्या रस्त्यावर निरपराधांचे रक्त सांडणाऱ्या मक्कीलाचा वाईट मृत्यू झाला आहे.
आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्याला अंथरुणावरुन उठणंही असहाय्य झालं होतं. त्याने ज्या हाताने निरपराध लोकांचे बळी घेतले होते. आयुष्याच्या शेवटी त्या हाताने त्याची साथ सोडली होती. ज्या दुष्ट मेंदूतून तो नरसंहार घडवायचा, ते कारस्थानी मेंदूही शेवटच्या क्षणी मंद झाला होता. अखेर जगातील या क्रूर दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
अब्दुल मक्की हा हाफिज सईदची सावली होता
अब्दुल रहमान मक्की हा लष्कर ए तैबाचा कुख्यात दहशतवादी तर होताच. शिवाय तो या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदचा मेहुणा होता. यावरून त्याची दहशतवादी संघटनेतील भूमिका समजू शकते. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधारांपैकी मक्की हा एक होता. या हल्ल्यात 175 जणांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. UN ने 2023 मध्ये मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. शिवाय, त्यांची संपत्ती गोठवण्यात आली होती आणि त्यांच्या परदेश प्रवासावरही बंदी घालण्यात आली होती. अब्दुल रहमान मक्की याला हाफिज सईदची सावली मानलं जात होतं.
advertisement
अब्दुल रहमान मक्की पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये आयोजित काश्मीर एकता दिनामध्ये नियमितपणे सहभागी व्हायचा. पाकिस्तानमध्ये दरवर्षी फेब्रुवारीमध्ये याचं आयोजन केलं जातं. मक्की 2010 मध्ये मुंबई हल्ल्याच्या जवळपास दोन वर्षांनंतर अशाच एका सभेत सहभागी झाला होता. यावेळी त्याने काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात द्या, अन्यथा भारतात रक्ताच्या नद्या वाहू लागतील, अशी धमकी दिली होती. भारताला खुलेआम धमक्या देऊनही दहशतवाद्यांचा समर्थक असलेल्या पाकिस्तानने त्यावर कारवाई केली नव्हती. आता या क्रूर दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
थरथरणारं शरीर, उठायचीही हिंमत नाही; मुंबईकरांचं रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्याचा भयावह अंत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement