मोठी बातमी: आता माणूस जगणार कॅन्सर हरणार, रशियानं कर्करोगावर बनवली लस
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Russia Discover Vaccine on Cancer : रशियाने संपूर्ण जगाला दिलासा देणारी बातमी दिली आहे. रशियानं कॅन्सरवर उपचार करू शकणारी लस बनवली आहे.
दिल्ली : सध्याच्या घडीला संपूर्ण जगात कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे. अशात रशियाने संपूर्ण जगाला दिलासा देणारी बातमी दिली आहे. रशियाने सांगितले की, त्यांनी कर्करोगाची लस तयार केली आहे, जी रशियातील सर्व नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असेल. सोमवारी (16 डिसेंबर), रशियन आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले की, त्यांनी कर्करोगाविरूद्ध लस विकसित केली आहे, जी 2025 च्या सुरुवातीपासून रशियामधील कर्करोगाच्या रुग्णांना मोफत दिली जाईल. रशियन सरकारी मालकीची वृत्तसंस्था TASS नुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी एका रशियन रेडिओ चॅनेलवर या लसीबद्दल माहिती दिली आहे.
मॉस्कोमधील गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झेंडर गिंट्सबर्ग यांनी यापूर्वी TASS ला सांगितलं होतं की, ही लस ट्यूमरची वाढ रोखू शकते आणि कर्करोगाचा प्रसार रोखू शकते. पण यामुळे ही लस सर्वसामान्य लोकांना दिली जाणार नाही. केवळ कर्करोग झालेल्या रुग्णांच्या उपचासाठी या लसीचा वापर केला जाणार आहे. ही लस प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाच्या रुग्णांना दिली जाऊ शकते.
advertisement
इतर देशांमध्येही कर्करोगावरील लस विकसित करण्याची स्पर्धा
रशियन नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटर आणि गामालेया नॅशनल रिसर्च सेंटरसह रशियन आरोग्य मंत्रालयाने या लसीबाबत पुष्टी केली आहे. तसेच लस कशी कार्य करते, हेही स्पष्ट केलं आहे. मात्र ही लस कोणत्या कर्करोगावर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा या लसीला काय म्हटलं जाईल, याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आली नाही.
advertisement
यापूर्वीही अशा लसी तयार करण्यात आल्यात
view comments2023 मध्ये यू.के सरकारने वैयक्तिक कर्करोग उपचार विकसित करण्यासाठी जर्मन जैवतंत्रज्ञान कंपनीशी करार केला होता. याशिवाय मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी या फार्मास्युटिकल कंपन्या सध्या त्वचेच्या कर्करोगाच्या लसींवर काम करत आहेत. आधीच बाजारात अशा लसी आहेत, ज्यांचे लक्ष्य कर्करोगास प्रतिबंध करणे आहे.
Location :
Delhi
First Published :
December 18, 2024 10:26 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
मोठी बातमी: आता माणूस जगणार कॅन्सर हरणार, रशियानं कर्करोगावर बनवली लस


