advertisement

Moon : चंद्राच्या मातीत सापडलं पाणी, शास्त्रज्ञांनी प्रथमच दिला पुरावा, चांद्रयान-1 च्या दाव्याला पुष्टी

Last Updated:

चंद्राच्या मातीत पाणी मिळाल्याचे आढळले आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी ChangE5 मोहिनेअंतर्गत चंद्रावरून माती आणली होती. त्यात पाण्याचे कण आढळले आहेत.

चंद्राच्या मातीत सापडलं पाणी, शास्त्रज्ञांनी प्रथमच दिला पुरावा, चांद्रयान-1 च्या दाव्याला पुष्टी
चंद्राच्या मातीत सापडलं पाणी, शास्त्रज्ञांनी प्रथमच दिला पुरावा, चांद्रयान-1 च्या दाव्याला पुष्टी
मुंबई : संपूर्ण विश्वासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चंद्राच्या मातीत पाणी मिळाल्याचे आढळले आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी ChangE5 मोहिनेअंतर्गत चंद्रावरून माती आणली होती. त्यात पाण्याचे कण आढळले आहेत. कोणत्याही देशाने चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा दिला असल्याची ही पहिलीच वेळ आहे. या संशोधनामुळे चंद्राबद्दल आणखीन माहिती मिळू शकते. तसेच याद्वारे चंद्रावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे की नाही हे सुद्धा कळेल.
चीनने 2020 मध्ये ChangE5 मिशन सुरु केलं होत. यामागचा उद्देश हा चंद्रावरील माती घेऊन येणे असा होता, जेणेकरून त्यातील पार्टिकल्‍सची तपासणी करण्यात येईल. आतापर्यंत बोलले जात होते की चंद्राचा पृष्ठभाग हा कोरडा आणि कडक आहे. मात्र आता चीनने चंद्रावरून आणलेल्या मातीवरून स्पष्ट झालंय की चंद्रावरील मातीत पाण्याचे अवशेष आहेत. त्यामुळे ती माती ओलसर असेल, यातून असे देखील समोर आले की चंद्रावर पाणी हे केवळ बर्फ़ स्वरूपात उपलब्ध नाही.
advertisement
काही दशकांपूर्वी, अपोलो मिशन अंतर्गत चंद्रावर गेलेल्या अमेरिकन अंतराळवीरांनी चंद्राच्या मातीचे नमुने आणले होते. यावरून शास्त्रज्ञांनी चंद्राची माती ही कोरडी असल्याचा निष्कर्ष काढला होता. याला नासाने सुद्धा पाठिंबा देत चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याची कमतरता असल्याचे सांगितले होते. मात्र आता तब्बल 40 वर्षांनी हा दावा फोल ठरून चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
यापूर्वी 2009 रोजी भारताच्या चांद्रयान 1 ने चंद्रावर पाणी असल्याचे संकेत दिले होते. भारताच्या अंतर‍िक्ष यानाने चंद्रावरील हाइड्रेटेड खनिजांचा शोध लावला होता. जी सूर्यप्रकाशाच्या भागात पाण्याच्या रेणूंची उपस्थिती दर्शवते. मात्र त्यानंतर तसे काहीही समोर आले नाही. नासाने नंतर स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमीच्या डेटाचा वापर करून चंद्राच्या सूर्यप्रकाशाच्या पृष्ठभागावर पाण्याचा शोध जाहीर केला. परंतु हा निष्कर्ष प्रामुख्याने रिमोट सेन्सिंगवर आधारित होता.
advertisement
ChangE5 मिशनच्या माध्यमातून चीनने 2020 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे नमुने घेतले होते. हे सॅम्पल्स अपोलो आणि सोव्हिएत लुना या मोहिमांमध्ये घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या तुलनेत जास्त उंचावरून घेतले गेले होते. बीजिंग नॅशनल लॅबोरेटरी फॉर कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स ऑफ द चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेस (सीएएस) च्या शास्त्रज्ञांनी चंद्रावरून आणलेल्या मातीवर संशोधन केले आणि त्यात पाण्याचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले. हा रिसर्च 16 जुलै रोजी नेचर ॲस्ट्रॉनॉमी मासिकात प्रकाशित झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Moon : चंद्राच्या मातीत सापडलं पाणी, शास्त्रज्ञांनी प्रथमच दिला पुरावा, चांद्रयान-1 च्या दाव्याला पुष्टी
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement