Bangladesh : अमेरिकन डिप्लोमॅट, ज्यांच्यावर शेख हसीनांच्या सत्तापालटाचा आरोप, पाकिस्तानचाही केलाय गेम!

Last Updated:

बांगलादेशात सत्तापालट झाला असून, पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि शिवाय देशही सोडावा लागला. त्या आपल्या बहिणीसह भारतात आल्या आहेत.

अमेरिकन डिप्लोमॅट, ज्यांच्यावर शेख हसीनांच्या सत्तापालटाचा आरोप, पाकिस्तानचाही केलाय गेम!
अमेरिकन डिप्लोमॅट, ज्यांच्यावर शेख हसीनांच्या सत्तापालटाचा आरोप, पाकिस्तानचाही केलाय गेम!
ढाका : बांगलादेशात सत्तापालट झाला असून, पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि शिवाय देशही सोडावा लागला. त्या आपल्या बहिणीसह भारतात आल्या आहेत. तिकडे बांगलादेशात लष्कराने अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसं पाहायला गेलं, तर बांगलादेशात गेल्या दोन महिन्यांपासून हिंसक निदर्शनं सुरू आहेत; मात्र गेल्या एक आठवड्यात परिस्थिती ज्याप्रमाणे बदलली, त्याचा अंदाज कोणीच बांधला नव्हता. आरक्षणाविरोधात सुरू झालेलं आंदोलन शेख हसीना यांच्या राजीनाम्यापर्यंत येऊन पोहोचलं.
5 ऑगस्टला निदर्शक पंतप्रधान निवासाकडे जाऊ लागले, तेव्हा शेख हसीना यांना घाईगडबडीत राजीनामा देऊन देश सोडावा लागला. बांगलादेशात सत्तापालट होण्याच्या या घटनेसाठी आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आणि अमेरिका कारणीभूत असल्याचं अनेक तज्ज्ञांना वाटतं. शेख हसीना यांचे पुत्र साजिब वाजेद यांनीही म्हटलं आहे, की सरकार पाडण्यामध्ये अमेरिकेचा हात असू शकतो.
advertisement
या संपूर्ण कथेत अमेरिकेच्या एका डिप्लोमॅटचं नाव पुढे येत आहे. डिप्लोमॅटिक सर्कलमध्ये त्या व्यक्तीला रेजिम चेंज म्हणजेच सरकार बदलणं या विषयातला मास्टरमाइंड असं म्हटलं जातं. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे डोनाल्ड लू.
कोण आहेत डोनाल्ड लू?
डोनाल्ड लू हे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटमध्ये 'ब्यूरो ऑफ साउथ अँड सेंट्रल एशियन अफेअर्स'चे असिस्टंट सेक्रेटरी आहेत. दक्षिण आणि मध्य आशियात अमेरिकेची धोरणं काय असतील हे ठरवण्याची आणि ती कशी लागू केली जातील, याची जबाबदारी डोनाल्ड लू यांच्या खांद्यावर आहे. डोनाल्ड लू यांच्याकडे 15 सप्टेंबर 2021 रोजी ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्याआधी 2018 ते 2021 पर्यंत ते किरगिझस्तानात अमेरिकेचे राजदूत म्हणून कार्यरत होते. 2015 ते 2018 पर्यंत ते अल्बानियामध्ये अँबेसेडर होते. लू यांना अमेरिकी सरकारसोबत काम करण्याचा 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांच्या डिप्लोमॅटिक करिअरमधला बहुतांश काळ भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशात व्यतीत झाला आहे. त्यामुळे त्यांना या देशांतलं राजकारण आणि मुत्सद्देगिरी (डिप्लोमसी) या विषयांतले तज्ज्ञ मानलं जातं.
advertisement
भारताशी संबंध
डोनाल्ड लू यांनी भारतात करिअरमधली बरीच वर्षं व्यतीत केली आहेत. 1996-97मध्ये ते पहिल्यांदा भारतात अमेरिकेच्या राजदूतांचे स्पेशल असिस्टंट बनून आले. त्यानंतर 1997 से 2000 या कालावधीत ते भारतात पॉलिटिकल ऑफिसर होते. 2009 साली त्यांना भारतात अमेरिकेचे Chargé d’Affaires ही जबाबदारी सोपवण्यात आली. 2010मध्ये त्यांना भारतातल्या अमेरिकी मिशनचे डेप्युटी चीफ करण्यात आलं. ते या पदावर सुमारे 3 वर्षं राहिले.
advertisement
प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतून त्यांनी इंटरनॅशनल रिलेशन या विषयात ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. डोनाल्ड लू मूळचे कॅलिफोर्नियाचे आहेत. त्यांना हिंदी, इंग्रजी, उर्दू, अल्बानिया, रशियन, अझरबैजानी अशा 8 भाषा बोलता आणि वाचता येतात.
बांगलादेशमध्ये अमेरिकेला काय रस?
सामरिक विशेषज्ञ सांगतात, की अलीकडच्या काही वर्षांत अमेरिकेचा बांगलादेशमधला रस वाढला. त्याची दोन कारणं आहेत. एक तर अमेरिकेची अशी इच्छा आहे, की बांगलादेशची चीनशी जवळीक वाढू नये. रणनीतीच्या दृष्टीने बांगलादेशाचं स्थान पाहता अमेरिकेला तिथे आपली एक पोस्ट उभारण्याची इच्छा होती, जेणेकरून भारत, पाकिस्तान आणि चीन यांसारख्या देशांवर नजर ठेवता येऊ शकेल. शेख हसीना यांच्या सरकारने क्वाडमध्ये सीट ऑफर करूनही हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यानंतर अमेरिका एक प्रकारे शेख हसीना यांच्यावर चिडलेला होता.
advertisement
शेख हसीना यांच्यावर कसा वाढवला दबाव?
शेख हसीना यांच्या सरकारने विरोधी पक्षांतल्या नेत्यांना तुरुंगात घालायला सुरुवात केली आणि दबावतंत्र अवलंबायला सुरुवात केली, तेव्हा अमेरिकेला संधी मिळाली. लोकशाहीच्या नावावर शेख हसीना यांच्यावर दबाव आणला जाऊ लागला. तरीही काही झालं नाही. तेव्हा अमेरिकेने अनेक कडक पावलं उचल. उदा. बांगलादेशच्या रॅपिड अॅक्शन बटालियनवर (RAB) एक्स्ट्रा जुडिशियल किलिंगचा आरोप ठेवून बॅन करण्यात आलं. हसीना यांच्याशी निगडित असलेल्या अनेक प्रभावशाली व्यक्तींवरही बॅन लादण्यात आला. तरीही शेख हसीना यांचं सरकार झुकलं नाही. रणनीती या विषयातल्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरच अलीकडेच झालेल्या बांगलादेशाच्या निवडणुकीत BNP आणि अन्य विरोधी पक्ष अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरच सहभागी झाले नव्हते. त्यामागे असा हेतू होता, की निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप करून शेख हसीना यांना सरकार स्थापन करू दिलं जाणार नाही आणि अमेरिकेला हवं तसं सरकार स्थापन होईल; मात्र प्रत्यक्षात शेख हसीना पुन्हा सत्तेत आल्या आणि तिथूनच अमेरिकेने त्यांच्या सत्तापालटाचं नियोजन केलं.
advertisement
बांगलादेशातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी डोनाल्ड लू तिथे गेले आणि शेख हसीना सत्तेत परत आल्या, तेव्हाही ते दौऱ्यावर गेले होते. रिपोर्ट्स असं सांगतात, की निवडणणुकीनंतर त्यांनी बांगलादेशात अनेक गुप्त बैठकाही घेतल्या. सामरिक विशेषज्ञ असं म्हणतात, की निवडणुकीच्या आधी आणि नंतर डोनाल्ड लू यांनी बांगलादेश दौरा केला होता, या गोष्टीवरूनही या बाबीला बळ मिळतं, की सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात आहे.
advertisement
पाकिस्तानातही खेळी
अमेरिकी डिप्लोमॅट डोनाल्ड लू चर्चेत असण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा पाकिस्तानात इम्रान खान यांचं सरकार पडलं, तेव्हाही ते चर्चेत आले होते. इम्रान खान यांनी उघडपणे डोनाल्ड लू यांचं नाव घेतलं आणि आपलं सरकार त्यांनी पाडल्याचा आरोप केला. इम्रान यांनी एवढंही सांगितलं, कीडोनाल्ड लू यांनी सरकार पाडण्याचं नियोजन कसं केलं, याबद्दलचे ठोस पुरावे त्यांच्याकडे आहेत.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Bangladesh : अमेरिकन डिप्लोमॅट, ज्यांच्यावर शेख हसीनांच्या सत्तापालटाचा आरोप, पाकिस्तानचाही केलाय गेम!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement