झिम्बाब्वेमध्ये तीव्र अन्नटंचाई, 200 हत्ती मारण्याचा निर्णय, मांस देशात वाटणार
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गेल्या महिन्यात झिम्बाब्वेचा शेजारी देश असलेल्या नामिबियातल्या भुकेल्या नागरिकांना अन्न म्हणून मांस मिळावं यासाठी 83 हत्तींना मारण्यात आलं.
झिम्बाब्वेमध्ये सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे अन्नधान्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तिथल्या वन्यजीव प्राधिकरणाने 200 हत्तींना मारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. ज्या भागातल्या नागरिकांना खायला अन्न नाही, त्यांना हत्तीचं मांस खाण्यासाठी दिलं जाणार आहे.
झिम्बाब्वे गेल्या चार दशकांतल्या सर्वांत भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. तिथली पिकं नष्ट झाली आहेत. लोकांना खायला अन्न मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे तिथल्या वन्यजीव प्राधिकरणाने 200 हत्तींना मारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागातल्या नागरिकांना खायला अन्न नाही, त्यांना या हत्तींचं मांस खायला दिलं जाणार आहे.
झिम्बाब्वे देशात सातत्याने दुष्काळ पडत आहे. माणूस आणि हत्ती यांच्यात संघर्ष वाढला आहे. त्यामुळे स्रोत घटू लागले आहेत. गेल्या वर्षी झिम्बाब्वेतल्या 50 नागरिकांचा हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. झिम्बाब्वे हा देश हत्तींच्या वाढत्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे. हस्तिदंत आणि जिवंत हत्तींच्या व्यवसायासाठी मार्ग खुला व्हावा यासाठी हा देश सध्या 'यूएन कन्व्हेंशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेंजर्ड स्पेसीज'साठी प्रयत्नशील आहे. झिम्बाब्वेकडे जगातला सर्वाधिक हस्तिदंताचा साठा आहे. या देशात 5022 कोटींचे हस्तिदंत पडून आहेत; पण झिम्बाब्वे त्यांची विक्री करू शकत नाही. सीआयटीईएसवर स्वाक्षऱ्या झाल्या तर या देशातली अन्नधान्याची टंचाई संपुष्टात येईल.
advertisement
झिम्बाब्वे पार्क्स अँड वाइल्डलाइफ प्राधिकरणाचे प्रवक्ते तिनाशे फारावो यांनी सांगितलं, की 'आम्ही हत्तींना मारण्याच्या निर्णय घेतला आहे. प्राधिकरण 200 हत्तींना मारणार आहे. हे काम देशभरात केले जाईल. हे काम कसं करायचं याचं नियोजन करत आहोत. ज्या भागात तीव्र दुष्काळ आहे, नागरिकांना अन्न मिळत नाही, तिथं हे मांस पाठवलं जाईल. झिम्बाब्वेत हत्तींची 1988पासून अधिकृतपणे हत्या केली जाते. हृ्यांगे, मबिरे, शोलोशो आणि चिरेजी जिल्ह्यात हत्तींची अधिकृतपणे हत्या होते.'
advertisement
'हत्तींना मारण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांची संख्या नियंत्रित राहते. जंगलातली गर्दी कमी होते. आमची जंगलं केवळ 55 हजार हत्तींना सांभाळू शकतात. सध्या देशात 84 हजारांपेक्षा जास्त हत्ती आहेत. 200 हत्ती मारले तर हे समुद्रातून एक थेंब बाहेर काढल्याप्रमाणे असेल,' असं तिनाशे यांनी सांगितलं.
गेल्या महिन्यात झिम्बाब्वेचा शेजारी देश असलेल्या नामिबियातल्या भुकेल्या नागरिकांना अन्न म्हणून मांस मिळावं यासाठी 83 हत्तींना मारण्यात आलं. आफ्रिकेतल्या पाच भागांत पाच लाखांपेक्षा जास्त हत्ती राहतात. यात झिम्बाब्वे, झांबिया, बोट्सवाना, अंगोला आणि नामिबियाचा समावेश आहे. जगात सर्वांत जास्त हत्ती याच आफ्रिकी देशांमध्ये आहेत.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
September 18, 2024 10:07 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
झिम्बाब्वेमध्ये तीव्र अन्नटंचाई, 200 हत्ती मारण्याचा निर्णय, मांस देशात वाटणार


