महावितरणचा नवा नियम! 2 महिन्यांचे वीज बिल थकले, तर सुरक्षा ठेवीतून होणार कपात, ग्राहकांना इशारा
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
वीज बिलाची वाढती थकबाकी लक्षात घेता, महावितरणने जुलै महिन्यापासून एक नवा नियम लागू केला आहे. यानुसार, सलग दोन महिन्यांचे वीज बिल थकीत राहिल्यास, तिसऱ्या...
लातूर : वीज ग्राहकांना महावितरणने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. ज्या ग्राहकांचे दोन महिन्यांचे वीज बिल थकीत राहील, त्यांच्या सुरक्षा ठेवीतून (Security Deposit) थकबाकीची रक्कम कापली जाईल, असा नवीन नियम महावितरणने जुलै महिन्यापासून लागू केला आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदार वीज ग्राहकांनी नियमितपणे दर महिन्याचे बिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणची वाढती थकबाकी
सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी दरवर्षी वाढत आहे, ज्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. याच कारणास्तव आता हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, सलग दोन महिन्यांचे वीज बिल थकीत राहिल्यास, तिसऱ्या महिन्यात ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून ती रक्कम कपात केली जाईल.
सुरक्षा ठेव भरल्याशिवाय वीज बिल भरता येणार नाही
एकदा सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात झाली की, संबंधित ग्राहकाला आधी कापलेली सुरक्षा ठेवीची रक्कम भरावी लागेल. त्यानंतरच त्यांना त्यांच्या बिलातील इतर शिल्लक रक्कम भरता येईल. महावितरणकडून दरवर्षी वाढीव वीज बिलानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम वाढवून पाठवली जाते. ज्या ग्राहकांनी ही वाढीव रक्कम भरलेली नसेल, त्यांना ती संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक असेल. ही रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी ग्राहकाला सुरक्षा ठेव आणि जुनी थकबाकी भरून वीजजोडणी शुल्क भरावे लागेल.
advertisement
जुलैपासून नियम लागू
या नियमाची अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाली आहे. दोन महिन्यांची थकबाकी असलेल्या ग्राहकांच्या बिलाची रक्कम सुरक्षा ठेवीतून कपात केली जात आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम वजा केल्यानंतर उर्वरित वीज बिल नवीन सुरक्षा ठेवीच्या रकमेसह स्वीकारले जात आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 08, 2025 12:45 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
महावितरणचा नवा नियम! 2 महिन्यांचे वीज बिल थकले, तर सुरक्षा ठेवीतून होणार कपात, ग्राहकांना इशारा









