Police Bharati 2025: 'वयाचं सोडा, तयारीला लागा', राज्यात 18000 पोलिसांची होणार भरती; जिल्हास्तरावर होणार 'अशी' निवड!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Police Bharati 2025: वयाची अट ओलांडलेल्या पोलीस भरतीच्या उमदेवारांनी सुवर्णसंधी आहे. राज्य सरकारकडून 18631 पोलीस शिपायांच्या भरतीचा नुकताच जीआर काढण्यात आला आहे. यामध्ये...
सांगली : वयाची अट ओलांडलेल्या पोलीस भरतीच्या (Police Bharati 2025) उमदेवारांनी सुवर्णसंधी आहे. राज्य सरकारकडून 18631 पोलीस शिपायांच्या भरतीचा नुकताच जीआर काढण्यात आला आहे. यामध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून भरती प्रक्रियेत अर्ज करत येणार आहे. यामुळे पोलीस भरतीचा तयारी करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे.
...अशी होणार निवड
2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाच विशेष बाब म्हणून पोलीस भरतीचा अर्ज सादर करता येणार आहे.. राज्यभरात पात्र झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर शारीरिक आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर उमदेवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवडयादी जाहीर होणार आहे.
advertisement
एकाच दिवशी होणार परीक्षा
राज्यभरात 15 हजार पोलीस शिपायांची भरती होणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक या शहरांत ही संख्या मोठी आहे. या भरतीमध्ये वाहनचालक आणि पोलीस शिपाई पदासाठी निवडी केल्या जाणार आहेत, अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. पोलीस भरतीसाठी उमदेवारांना एकाच अर्जाची परवानगी आहे. एकाच दिवशी लेखी परीक्षा, प्रथम 50 गुणांचा शारीरिक चाचणी आणि त्यानंतर एका पदासाठी 10 उमदेवारांची निवड करण्यात येणार आहे.
advertisement
खाकीचं स्वप्न पूर्ण होणार
पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ही मोठी संधी आहे. त्यामुळे मुलांची तयारीही जोरदार सुरु आहे. सध्या अर्ज नोंदणीवर उमेदवारांची लक्ष लागून राहिलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले की, पोलीस भरतीची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 8:24 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Police Bharati 2025: 'वयाचं सोडा, तयारीला लागा', राज्यात 18000 पोलिसांची होणार भरती; जिल्हास्तरावर होणार 'अशी' निवड!


