Prasad Oak : रिजेक्ट! रिजेक्ट! रिजेक्ट! 5000 ऑडिशन्स, तरी मराठी अभिनेत्याला मिळेना एकही अॅड

Last Updated:

Prasad Oak : "पाच हजार ऑडिशन्स दिल्या, पण आजपर्यंत एकही टीव्ही अॅड मिळाली नाही", असं अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला आहे.

News18
News18
Prasad Oak : गोड कुटुंबाची, तिखिट लव्हस्टोरी असणारा 'वडापाव' या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकची रुचकर पाककृती असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. गेल्या काही वर्षांत प्रसाद ओक कधी अभिनय, तर कधी दिग्दर्शनाच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांवर झळकत असणारा प्रसाद ओक छोट्या पडद्यावरील जाहिरातींपासून मात्र दूर आहे. याबद्दल नुकतच एका मुलाखतीत बोलताना प्रसाद ओक म्हणाला,"पाच हजार ऑडिशन्स दिल्या, पण आजपर्यंत एकही टीव्ही अॅड मिळाली नाही".
प्रसाद ओकने दिल्यात पाच हजार ऑडिशन्स!
प्रसाद ओक एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,"किती मालिका केल्यात, किती चित्रपट केले, किती व्यावसायिक नाटकं झाली याचा सगळ्याचा मी माझ्याकडे रेकॉर्ड ठेवला आहे. आजपर्यंत मला एकही व्यावसायिक जाहिरात मिळालेली नाही. ऐकताना खोटं वाटेल पण मी जवळजवळ पाच ते सहा हजार ऑडिशन्स दिल्यात जाहिरातीसाठी. पण मला एकही टीव्ही अॅड मिळालेली नाही".
advertisement
प्रसाद ओक मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक, गायक, लेखक आणि कवी आहे. 'अवघाची संसार' या मालिकेच्या माध्यमातून प्रसाद ओकने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. धर्मवीर, फर्जंद, धुरळा, हिरकणी असे त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
advertisement
प्रसाद ओकच्या 'वडापाव'ची प्रतीक्षा
'वडापाव' हा प्रसाद ओकच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे तो पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे त्यासाठी हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
advertisement
तीन पिढ्यांची गोष्ट सांगणारा 'वडापाव' हा चित्रपट आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. जीवनात आपुलकीसोबत थोडा तिखटपणा हवाच. नाहीतर नातं फिकं पडतं. हाच बॅलन्स दाखवणारा हा चित्रपट आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Prasad Oak : रिजेक्ट! रिजेक्ट! रिजेक्ट! 5000 ऑडिशन्स, तरी मराठी अभिनेत्याला मिळेना एकही अॅड
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement