Asia Cup : सुपर-4 आधी कॅप्टन सूर्यकुमार दाखवणार बेंचवरची ताकद? प्लेइंग 11 मध्ये अर्शदीपसह 'या' दोघांना संधी मिळणार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Asia Cup 2025 : मुख्य वेगवान बॉलर जसप्रीत बुमराहला ओमानविरुद्धच्या मॅचमध्ये विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. बुमराह फिट राहणे भारतासाठी सुपर-4 आणि फायनलसाठी खूप महत्त्वाचे आहे.
India vs Oman : आशिया कपमधील लीग स्टेजचा अखेरचा सामना भारत आणि ओमान यांच्यात खेळवला जाईल. हा सामना टीम इंडिया झोपून उठून देखील जिंकू शकते, असा विश्वास सूर्यकुमार यादवला देखील असेल. पण आशिया कपमधील भारताचा ओमानविरुद्धचा शेवटचा ग्रुप सामना केवळ औपचारिकता म्हणून पाहिला जात असला तरी, टीम मॅनेजमेंट या मॅचकडे पुढील आव्हानांची तयारी म्हणून पाहत आहे. हा सामना जरी निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा नसला तरी, टीमच्या रणनीतीसाठी तो खूपच महत्त्वपूर्ण मानला जातोय.
बुमराहला ओमानविरुद्धच्या मॅचमध्ये विश्रांती
पुढील सात दिवसांत भारताला चार महत्त्वाच्या मॅचेस खेळाव्या लागू शकतात. त्यामुळे, टीममधील महत्त्वाच्या खेळाडूंची फिटनेस जपण्यावर भर दिला जात आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून, मुख्य वेगवान बॉलर जसप्रीत बुमराहला ओमानविरुद्धच्या मॅचमध्ये विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. बुमराह फिट राहणं भारतासाठी सुपर-4 आणि फायनलसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग किंवा हर्षित राणा यांना संधी दिली जाऊ शकते, ज्यामुळे त्यांना मॅचचा अनुभव मिळेल.
advertisement
शुभमन गिलला विश्रांती देणार?
या मॅचमध्ये भारतीय बॅटिंग लाईन-अपलाही चांगला सराव करण्याची संधी मिळणार आहे. सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस एकतर्फी झाल्याने टॉप ऑर्डरच्या बॅटर्सना जास्त वेळ क्रीजवर टिकून राहता आले नाही. त्यामुळे, ओमानविरुद्धच्या मॅचमधून बॅटर्सना आवश्यक लय आणि आत्मविश्वास मिळवता येईल. पण अर्शदीपसह रिंकू सिंगला देखील संधी मिळू शकते. तसेच अक्षर पटेलच्या जागेवर हर्षित राणा याला संधी मिळू शकते. तसेच शुभमन गिलला विश्रांती देणार असल्याची शक्यता देखील आहे.
advertisement
सुपर-4 ची तयारी
सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबतच श्रीलंका व अफगाणिस्तानसारख्या मजबूत टीम्स आहेत, ज्या अधिक आव्हान देऊ शकतात. त्यामुळे, हा सामना केवळ एक मॅच नसून, आगामी मोठ्या मॅचेससाठी एक सराव आणि तयारीचा भाग म्हणून पाहिला जात आहे. या मॅचमध्ये बॅटर्सचा सराव आणि बॉलिंगचे कॉम्बिनेशन जुळल्यास, टीम इंडिया आणखी मजबूत होऊन पुढील मॅचेसमध्ये उतरेल. त्यामुळे, ओमानविरुद्धच्या मॅचला कमी लेखता येणार नाही, कारण सुपर-4 च्या तयारीसाठी त्याचे मोठे महत्त्व आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : सुपर-4 आधी कॅप्टन सूर्यकुमार दाखवणार बेंचवरची ताकद? प्लेइंग 11 मध्ये अर्शदीपसह 'या' दोघांना संधी मिळणार!