Siddhivinayak Temple: भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिर सलग पाच दिवस बंद राहणार, नेमकं कारण काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
श्री सिद्धिविनायक मंदिर पुढचे पाच दिवस बंद असणार आहे. या संबंधितचं वृत्त सिद्धिविनायक मंदिराच्या सोशल मीडिया हँडलवरून देण्यात आलं आहे.
मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिराबद्दल महत्त्वाची बातमी समोर येत आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर पुढचे पाच दिवस बंद असणार आहे. या संबंधितचं वृत्त सिद्धिविनायक मंदिराच्या अधिकृत एक्स हँडलवरून देण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातून आणि परदेशातूनही दररोज मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र, दरवर्षी पार पडणार्या धार्मिक परंपरेनुसार या वर्षीही काही दिवसांसाठी गाभार्यातील मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन उपलब्ध असणार नाही.
सिद्धिविनायक मंदिर येत्या 7 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत श्री गणेशाच्या मुर्तीवर सिंदूर लेपनाचा विधी केला जाणार आहे. या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष मुर्तीचे दर्शन मिळणार नाही. मंदिर बंद असण्याच्या कालावधीतच मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण विधी आटोपले जाणार आहेत. धार्मिक प्रक्रिया अत्यंत श्रद्धेने आणि विधीवत पद्धतीने पार पाडली जाते. सिंदूर लेपनाच्या काळात गाभार्यातील मूर्तीला हाताळणी आणि विधी सुरू असल्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष दर्शन देता येणार नाही. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी श्री गणेशाच्या फोटोचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
advertisement
— Shri Siddhivinayak Temple (@SVTMumbai) January 3, 2026
जेणेकरून भाविकांना दर्शन घेता येईल. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून भाविकांना या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 7 जानेवारी ते 11 जानेवारी या पाच दिवसांमध्ये सिंदूर लेपनाचा विधी, स्वच्छता आणि संबंधित धार्मिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. सिंदूर लेपनाचा विधी पूर्ण झाल्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी विधीवत पूजा- अर्चा पार पडल्यानंतर आणि विशेष पूजेनंतर दुपारी 1 वाजता मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. त्या वेळेपासून श्री सिद्धिविनायक गणपतीच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 6:21 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Siddhivinayak Temple: भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिर सलग पाच दिवस बंद राहणार, नेमकं कारण काय?










