स्पॉटबॉय ते बॉलिवूडचा फेमस खलनायक; आज जगतोय असं आयुष्य

Last Updated:

Bollywood Famous Villain : बॉलिवूडचा फेमस खलनायक सध्या काय करतोय, कसं आयुष्य जगतोय जाणून घ्या...

News18
News18
बॉलिवूडमध्ये जेवढे नायक लोकप्रिय आहेत तेवढीच खलनायकांचीदेखील क्रेझ पाहायला मिळते. 90 च्या दशकातील अनेक खलनायकांनी आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली आहे. पण यातील एक खलनायक सध्या काय करतोय, कुठे आहे? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सनी देओलसोबत काम केलेल्या या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये आपलं चांगलच नाव कमावलं. यशाच्या शिखरावर असताना अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झालाय.
इशरत अली असं या अभिनेत्याचं नाव आहे. त्याने गदर या सुपरहिट चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला होता. आपल्या भूमिकेने त्याने चाहत्यांचं मन जिंकलं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर त्याला अनेक उत्तमोत्तम चित्रपटांसाठी ऑफर मिळू लागल्या. त्यामुळे सिनेसृष्टीत त्याने खलनायक अशी आपली वेगळी ओळख निर्माण केली.'गदर'सह 'क्रांतिवीर' सारख्या सुपरहिट सिनेमातही त्याने भूमिका केली होती. काही काळानंतर त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटूंबाची सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावर पडली. त्यामुळे वडीलांचा व्यवसाय त्याला सांभाळावा लागला आणि अभिनय क्षेत्राला पूर्णविराम द्यावा लागला. घराच्या जबाबदाऱ्या जोवर पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सिनेमात काम करणार नाही, असं त्याने ठरवलं होतं.
advertisement
मायानगरीत योग्य मार्गदर्शन करणारं त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी नव्हतं. पण त्याच्यातील जिद्द आणि हिंमत त्याला शांत बसू देत नव्हती. म्हणून त्याने सुरुवातीला स्पॉट बॉयचे काम केले. ते करत असताना सिनेक्षेत्राचा आणि अभिनयाचा अभ्यास केला, शिकला आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली.
'कालचक्र' पासून मिळाली ओळख
सिनेक्षेत्रातील सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करत असताना त्याने एक ऑडिशन दिली होती. जी ऑडिशन त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याला द्यायला सांगितली होती. 'कालचक्र' असं या चित्रपटाचं नाव होतं. दिलीप शंकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात खलनायक भूमिकेसाठी त्याची निवड झाली. त्याने साकारलेल्या खलनायकाचं नाव यशवंत कात्रे असं होतं. सुरुवातीच्या स्ट्रगल काळात पुढे काम मिळवण्यासाठी या भूमिकेमुळे खूपच मदत झाली.
advertisement
अन् आध्यात्माकडे वळला...
इशरत अलीला 2014 नंतर कोणताचा चित्रपट मिळाला नाही. त्यामुळे तो कोणत्याच सिनेमात दिसला नाही. इशरत अली आता आध्यात्माकडे वळला आहे. आपल्या मुलांसोबत, बायकोसोबत सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे तो आयुष्य जगत आहे. दिवसातून पाच वेळा तो नमाज पठन करतो.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
स्पॉटबॉय ते बॉलिवूडचा फेमस खलनायक; आज जगतोय असं आयुष्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement