advertisement

सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक आदेश, कोर्टात आता “तारीख पर तारीख” बंद; CJI सूर्यकांत यांचे 3 मोठे निर्णय, 1 डिसेंबरपासून कडक नियम लागू

Last Updated:

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचे नवे CJI सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारताच न्यायालयीन कामकाजात मोठे बदल जाहीर केले, ज्यामुळे “तारीख पर तारीख”ची प्रथा थांबणार आहे. 1 डिसेंबरपासून प्रकरणांची लिस्टिंग, तातडीची सुनावणी आणि स्थगनासंबंधीचे सर्व नियम नव्या पद्धतीने लागू होणार आहेत.

News18
News18
नवी दिल्ली: भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून सुप्रीम कोर्टात पदभार स्वीकारताच न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मोठी घोषणा केली आहे. आता न्यायालयाततारीख पर तारीखसहज मिळणे शक्य होणार नाही. शुक्रवार रोजी सुप्रीम कोर्टाने मोठे प्रशासकीय बदल लागू करत, प्रकरणांची लिस्टिंग, तातडीची सुनावणी आणि स्थगन (adjournment) यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया नव्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने रचण्याचे जाहीर केले. हे सर्व नवे नियम 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.
advertisement
बार अँड बेंच’च्या अहवालानुसार, जारी केलेल्या चार सर्क्युलर्सचा सर्वात मोठा परिणाम असा होईल की सीनियर अ‍ॅडव्होकेट्स आता कोणत्याही प्रकरणात मौखिक मेंशनिंग (म्हणजे न्यायालयात वकिलांनी तोंडी विनंती करून एखादे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी सादर करणे होय) करू शकणार नाहीत. तसेच व्यक्तिगत स्वातंत्र्याशी थेट संबंधित असलेली सर्व महत्त्वाची प्रकरणे दोन कार्यदिवसांच्या आत स्वयंचलितपणे (automatically) सूचीबद्ध केली जातील आणि त्यासाठी कुठल्याही मेंशनिंगची गरज राहणार नाही.
advertisement
याशिवाय तातडीच्या अंतरिम मदतीची (interim relief) गरज असलेली प्रकरणे जसे की जामीन, अग्रिम जामीन, हेबिअस कॉर्पस, मृत्युदंड, बेदखली किंवा पाडकामावर स्थगन ही प्रकरणे कोणतीही विलंब न लावता थेट लिस्ट केली जातील.
advertisement
आता तारीख पर तारीख सोपे नाही
CJI सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ जारी केलेले हे सुधारणा नियम सुप्रीम कोर्टातील अनियंत्रित मौखिक मेंशनिंगला आळा घालणे, सुनावणीची टाइमलाइन पारदर्शक करणे आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणांचा वेगाने निपटारा करणे या उद्देशाने आणले गेले आहेत.
advertisement
आता वकीलांना स्लॉट मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही किंवा पुन्हा पुन्हा मेंशनिंग करण्याची आवश्यकता राहणार नाही. स्थगनाच्या प्रक्रियेलादेखील आता कठोर आणि एकसमान चौकटीत बसवण्यात आले आहे.
फक्त विरोधी पक्षाची पूर्वमान्यता (consent) असल्यासच स्थगन स्वीकारले जाईल, तेही ठराविक मुदतीत अर्ज झाल्यास.
advertisement
संपूर्ण प्रणालीचे पुनर्रचना (Re-design)
नवीन निर्देशांनुसार, मौखिक मेंशनिंग फक्त त्याच प्रकरणांसाठी करता येईल जी एक दिवस आधी प्रसिद्ध झालेल्या “मेंशनिंग लिस्ट”मध्ये असतील. सीनियर वकीलांना मेंशनिंगवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे, तर युवा वकिलांना ही जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.
advertisement
स्वयंचलितपणे सूचीबद्ध होणाऱ्या प्रकरणांपैकी सर्वात मोठा बदल जामीन प्रणालीमध्ये केला आहे. एखादी जामीन याचिका नोंदवली जाईल, तसेच अ‍ॅडव्होकेटऑनरिकॉर्डला संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश किंवा केंद्र सरकारच्या स्टँडिंग कौन्सललाअ‍ॅडव्हान्स कॉपी’ देणे अनिवार्य राहील.
प्रूफ ऑफ सर्व्हिस’ जमा न करता याचिका ना तर व्हेरिफाय होईल, ना लिस्ट होईल. यामुळे सरकारकडून न्यायालयात वेळेवर आणि प्रभावी प्रतिनिधित्व होईल, याची खात्री केली जाईल.
वेळेची काटेकोर अट
ज्या प्रकरणांवर स्वयंचलित लिस्टिंग लागू नाही, त्यासाठी वकिलांनी ठराविक प्रोफॉर्मा आणि तपशीलवार अर्जेंसी लेटरसह दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करावा लागेल. शनिवारच्या दिवशी ही मर्यादा 11:30 वाजेपर्यंत असेल.
अत्यंत तातडीच्या परिस्थितीत अर्जेंसी लेटर 10:30 वाजेपर्यंत स्वीकारले जाऊ शकते. मात्र त्यात हे स्पष्टपणे दाखवलेले असावे की ही बाब नियमित प्रक्रियेची वाट पाहू शकत नाही.
स्थगन प्रक्रियेत कठोर नियम
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की स्थगन फक्त शोक, गंभीर आरोग्य कारणे किंवा अत्यंत विशेष परिस्थितीतच दिले जाईल. स्थगनासाठीचा अर्ज ऑनलाइन निर्धारित फॉर्मॅटमध्ये ईमेलद्वारे पाठवणे अनिवार्य असेल आणि पूर्वी घेतलेल्या स्थगनांची संख्या नमूद करणेही आवश्यक आहे.
हे चारही सर्क्युलर मिळून सुप्रीम कोर्टात शिस्तबद्ध, वेळेवर आणि Predictable लिस्टिंग प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. विशेषत: अशा प्रकरणांसाठी जे थेट एखाद्या नागरिकाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित आहेत.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक आदेश, कोर्टात आता “तारीख पर तारीख” बंद; CJI सूर्यकांत यांचे 3 मोठे निर्णय, 1 डिसेंबरपासून कडक नियम लागू
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement