IND vs PAK : सुपर 4 मध्ये पाकड्यांची पुन्हा इज्जत निघणार! मांजरेकरांच्या प्रश्नावर सूर्याने पाकिस्तानला केलं इन्गोर, काय म्हणाला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav On IND vs PAK Super 4 match : तुम्ही रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी पूर्णपणे तयार आहात का? मांजरेकरच्या प्रश्नाला उत्तर देताना सूर्यकुमारने 'पाकिस्तान' या शब्दाचा वापर टाळला
India vs Pakistan Super 4 : भारत आणि ओमान यांच्यात झालेल्या सामन्यानंतर उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर 4 चा दुसरा सामना खेळवला जाईल. अशातच ओमानविरुद्ध 21 रनने विजय मिळवल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याने ओमान टीम आणि आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं. मात्र, जेव्हा त्याला पुढील मॅचबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने 'पाकिस्तान'चं नाव न घेता दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.
संजय मांजरेकरांच्या प्रश्नावर सुर्यकुमार काय म्हणाला?
मॅच संपल्यानंतर, पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी त्याला विचारलं, तुम्ही रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी पूर्णपणे तयार आहात का? मांजरेकरच्या प्रश्नाला उत्तर देताना सूर्यकुमारने 'पाकिस्तान' या शब्दाचा वापर टाळला. सुपर फोरसाठी पूर्णपणे तयार आहोत, असं सूर्यकुमार यादव पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये म्हणाला. त्यामुळे आता सूर्याच्या उत्तरामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
आयसीसीचा पाकिस्तानला झटका
सूर्यकुमारने दिलेल्या या उत्तरावरून तो कोणत्याही एका टीमबद्दल बोलण्याऐवजी संपूर्ण स्पर्धेसाठी तयार असल्याचं दाखवून दिलं. पण पाकिस्तानला इग्नोर केल्यानंतर आता पुन्हा वाद पेटल्याचं पहायला मिळालं आहे. आयसीसीने पाकिस्तानला झटका दिल्यानंतर पीसीबीला नमतं घ्यावं लागलं. पाकिस्तानने आयसीसीसमोर गुघडे टेकवले. त्यामुळे आता पाकिस्तानला पुन्हा खाली मान घालून भारताविरुद्ध खेळावं लागणार आहे.
advertisement
टीम इंडिया - सूर्यकुमार यादव (C), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
पाकिस्तान - सलमान अली आगा (C), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
IND vs PAK : सुपर 4 मध्ये पाकड्यांची पुन्हा इज्जत निघणार! मांजरेकरांच्या प्रश्नावर सूर्याने पाकिस्तानला केलं इन्गोर, काय म्हणाला?