Kitchen Hacks: करपलेलं दूध फेकून देताय? थांबा, बनवू शकता हे 5 चविष्ट पदार्थ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दूध हा आपल्या स्वयंपाकघरात नियमित आणि भरपूर वापरला जाणारा पदार्थ आहे. चहा-कॉफीपासून अनेक गोड पदार्थांपर्यंत, तसंच दही-ताक-लोणी-तूप करण्यासाठीही नियमित दूध वापरलं जातं; मात्र कधी तरी दूध तापवताना दुर्लक्ष झालं आणि ते करपलं तर काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो.
नवी दिल्ली : दूध हा आपल्या स्वयंपाकघरात नियमित आणि भरपूर वापरला जाणारा पदार्थ आहे. चहा-कॉफीपासून अनेक गोड पदार्थांपर्यंत, तसंच दही-ताक-लोणी-तूप करण्यासाठीही नियमित दूध वापरलं जातं; मात्र कधी तरी दूध तापवताना दुर्लक्ष झालं आणि ते करपलं तर काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो. सध्या दूध खूप महाग झालंय. त्यामुळे ते टाकून देणं जिवावर येतं. अशा वेळी त्या दुधाचा पुनर्वापर कसा करायचा हे जाणून घेऊ या.
करपलेलं दूध निरुपयोगी असं समजून ते फेकून दिलं जातं; पण थोडा विचारपूर्वक वापर केला तर त्याच दुधापासून एखादा छान पदार्थ तयार होऊ शकतो. अशाच काही रेसिपीज जाणून घेऊ या. दुधापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये पहिला क्रमांक लागतो तो खिरीचा! करपलेल्या दुधापासून साखरेचा पाक करून घ्या. मग त्यात रवा किंवा तांदूळ किंवा शेवया घाला. मिश्रण छान उकळून घ्या. शेवटी वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घाला. खीर तयार होईल.
advertisement
करपलेल्या दुधाचा पुनर्वापर करून छान हलवा किंवा शिराही तुम्ही करू शकता. त्यासाठी दुधात तूप, साखर आणि रवा घालून मंद आचेवर शिजवून घ्या. शेवटी वेलची पावडर घाला. त्यामुळे करपट वास जाईल आणि चविष्ट शिरा तयार होईल. रस्सम करण्यासाठीही करपलेल्या दुधाचा पुनर्वापर तुम्ही करू शकता. त्यासाठी फोडणी करून त्यात टोमॅटो, कोथिंबीर आणि मसाले परतून घ्या. वरून दूध ओता. छान उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. रस्सम फाटू नये म्हणून ते करताना त्यात मीठ घालू नका. जेवताना चवीप्रमाणे मीठ घालून घ्या.
advertisement
करपलेल्या दुधापासून तुम्ही बर्फीही बनवू शकता. त्यासाठी दुधात साखर, तूप आणि कसुरी मेथी घाला. मिश्रण आटून त्याचा गोळा झाल्यानंतर तूप लावलेल्या ताटात काढून थापून त्याच्या वड्या कापून घ्या. बर्फी तयार होईल. ही बर्फी तयार करताना त्यात तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही इसेन्स किंवा रंग घालू शकता.
करपलेलं दूध वापरण्यापूर्वी ते गाळण्याने गाळून घ्या. त्यात थोडं पाणी मिसळा. जळकट वास आणि चव कमी करण्यासाठी त्यात दालचिनी पावडर घाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 17, 2024 9:34 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Kitchen Hacks: करपलेलं दूध फेकून देताय? थांबा, बनवू शकता हे 5 चविष्ट पदार्थ








