UdayanRaje Bhosale : मोठी बातमी, उदयनराजेंनी घेतली शिवेंद्रराजेंची भेट, साताऱ्याच्या राजकारणाला नवं वळण
- Published by:Rahul Punde
Last Updated:
UdayanRaje Bhosale : सातारा लोकसभेचं तिकीट मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी आज शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली.
सातारा, (सचिन जाधव, प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, आता दोन्ही आघाड्यांसमोर नाराज आणि बंडखोरांचे आव्हान उभं राहिलं आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साताऱ्याच्या जागेवरुन चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत होती. उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale) चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले होते. त्यांनी थेट दिल्लीतून उमेदवारी आणल्याचे समजते. यानंतर आता उदयनराजे यांच्याकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाली आहे.
उदयनराजे शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीला
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे एकाच पक्षात अर्थात भाजपमध्ये असले तरी त्यांच्यातील शीतयुद्ध नेहमी पाहायला मिळतं. या दोघांच्या समर्थकांमध्येही अनेकदा राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, आता लोकसभा जवळ आल्याने उदयनराजे यांनी पहिलं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार उदयनराजे भोसले आज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीला सुरुची बंगल्यावर पोहचले. शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे आल्याचे समजले. उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना भेटुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माझं कधी काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. म्हणत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच्या दिलजमाईसाठी प्रयत्न केले. उदयनराजे भोसले यांना भाजपानं लवकरात लवकर तिकीट द्यावं अशी इच्छा यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.
advertisement
सातव्या यादीतही नाव नाही?
सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे भोसले यांनी थेट दिल्लीशी संपर्क केला होता. दिल्लीहून परतल्यानंतर उदयनराजे भोसले यांचं सातारकरांनी जंगी स्वागत केलं होतं. आपण थेट दिल्लीतून उमेदवारी आणल्याचे समजते. याबाबत स्वत: उदयनराजे भोसले यांनीही साताऱ्यात आल्यानंतर माहिती दिली होती. मात्र, भाजपाची महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर झाली, तरी त्यात साताऱ्याचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सातवी यादी आली त्यात तुमचे नाव नाही नेमके काय कारण आहे? तुमचे नाव आजपर्यंत का जाहिर केले नाही? यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, प्रक्रिया असते, पहिली फेसची यादी वगैरे, मला काहीच शंका वाटत नाही. तुम्हीही मनात शंका आणू नका. सगळं झालेलं आहे. शंका घेण्याचे काही कारण नाही.
advertisement
2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव
view commentsउदयराजे भोसले यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर लढली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. मात्र, काही आठवड्यांमध्येच खासदारकीचा राजीनामा देत ते भाजपवासी झाले. दरम्यान या मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभेच्या निवडणुकीबरोबर घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव केला होता.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Mar 30, 2024 3:49 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
UdayanRaje Bhosale : मोठी बातमी, उदयनराजेंनी घेतली शिवेंद्रराजेंची भेट, साताऱ्याच्या राजकारणाला नवं वळण









