‘कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे’, गाडी चोरासाठी सोलापूरकर तरुणाची खास कविता Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सोलापुरातील एका तरुणाची दुचाकी चोरीला गेल्यामुळे त्याने चोराला शिव्या न देता, 'गाडीला जास्त त्रास देऊ नको, कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे', अशी विनंती कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर केली आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. सोलापुरातील एका तरुणाची दुचाकी चोरीला गेल्यामुळे त्याने चोराला शिव्या न देता, 'गाडीला जास्त त्रास देऊ नको, कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे', अशी विनंती कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर केली आहे. शहाजी कांबळे असे या तरुणाचे नाव आहे. या संदर्भात अधिक माहिती शहाजी कांबळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
शहाजी कांबळे रा. सलगर वस्ती सोलापूर यांनी 2012 साली MH13 AM 3924 या क्रमांकाची सेकंड हँड दुचाकी घेतली होती. 8 मार्चला गाडीवर बसून सोलापूर शहरातील डफरीन चौक येथील काळजापूर मारुती येथे शहाजी कांबळे हे आपल्या पत्नीसह दर्शनासाठी दुचाकीवर आले होते. दर्शन झाल्यानंतर बाहेर येऊन पाहिले तर ज्या ठिकाणी दुचाकी पार्क करून ठेवली होती त्या ठिकाणी दुचाकी दिसली नाही. शहाजी कांबळे यांनी पत्नीसह आजूबाजूला दुचाकी संदर्भात विचारणा केली, पण दुचाकी संदर्भात माहिती मिळाली नाही. तेव्हा शहाजी कांबळे यांना लक्षात आले की आपली दुचाकी गाडी ही चोरीला गेली आहे.
advertisement
चालकाने या शब्दात मांडल्या आपल्या भावना
'गाडी गेली याचं दुःख नाही, पण गाडीने माझ्यासोबत लय दुःख भोगलं. माझ्या सर्व दुःखात तिने खांद्याला खांदा लावून साथ दिली. कधी धोका नाही दिला. कधी ऐनवेळी पंक्चर झाली नाही. माझ्याकडून सव्हिसिंग करायची राहून गेली. प्रत्येकवेळी म्हणणार पगार झाल्यावर करू, पुढच्या पगाराला करू, पण तिची सेवा करायची संधी मिळाली नाही. तिने खूप समजून घेतलं मला, माझ्या परिस्थितीला. मी कुठं जाऊन फिरत होतो. कुठं जाऊन रडत होतो, कुणासाठी रडत होतो, तिला सगळं माहीत आहे. पण, ती बोलली नाही. चोरट्याला विनंती आहे की, तिला जास्त त्रास देऊ नये. ती खूप प्रामाणिक आहे. तिची काळजी घ्यावी. कधी मला ओळखलंच, तर तिला एकदा माझ्याकडे वळून बघू द्या'. आधीच आर्थिक संकटात असलेल्या या हळव्या तरुणाने चोराला शिव्या न देता कविता करत शहाजी कांबळे या तरूणाने चोराला कवितेच्या माध्यमातून विनंती केली आहे. तर अज्ञात चोट्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 19, 2025 5:44 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
‘कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे’, गाडी चोरासाठी सोलापूरकर तरुणाची खास कविता Video







