Soyabean Rate Today : सोयाबीनची आवक वाढली, दरात पुन्हा तेजी, सध्याचे बाजारभाव काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soyabean Market : राज्यातील सोयाबीन बाजारात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे. पिवळ्या सोयाबीनला राज्यभरात सर्वाधिक मागणी दिसून आली आहे.
advertisement
25 नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकूण सोयाबीन आवक 71,124 क्विंटल इतकी झाली. बहुतेक बाजारात आवक मध्यम ते जास्त प्रमाणात होती. पिवळ्या सोयाबीनला व्यापाऱ्यांची विशेष पसंती मिळत असल्याने या जातीचे दर अनेक बाजारात 4,400 ते 5,100 रुपयांच्या दरम्यान स्थिर होते. तर लोकल व मिक्स सोयाबीनला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला.
advertisement
पिवळ्या सोयाबीनच्या खरेदीमध्ये वाढ - अकोला, मेहकर, चिखली, उमरेड, उमरखेड, बीड, यवतमाळ या बाजारांमध्ये पिवळ्या सोयाबीनची मागणी वाढताना दिसली. व्यापाऱ्यांनी सकाळपासून विक्रमी खरेदी केली. ज्याचा भावावर सकारात्मक परिणाम दिसून आला. विशेष म्हणजे, सोलापूर, अमरावती आणि नागपूर बाजारांमध्ये लोकल सोयाबीनची आवक जास्त होती, पण भाव मात्र मध्यम पातळीवर राहिले.
advertisement
advertisement


