नोव्हेंबरमध्ये ३ पालेभाज्यांची लागवड करा अन् २ महिन्यांत लाखो रुपये कमवा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : नोव्हेंबर महिना शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात हवामान थंड आणि आर्द्र असते, जे अनेक भाज्यांच्या वाढीसाठी आदर्श असते. विशेषतः पालेभाज्यांची लागवड या काळात मोठा नफा देऊ शकते.
नोव्हेंबर महिना शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात हवामान थंड आणि आर्द्र असते, जे अनेक भाज्यांच्या वाढीसाठी आदर्श असते. विशेषतः पालेभाज्यांची लागवड या काळात मोठा नफा देऊ शकते. नोव्हेंबरमध्ये लागवड करून केवळ दोन महिन्यांत चांगला उत्पन्न मिळवून देणाऱ्या चार प्रमुख पालेभाज्यांचा उल्लेख कृषी तज्ञांनी केला आहे. कमी खर्चात आणि कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
advertisement
advertisement
पालक ही कमी खर्चिक आणि जास्त नफा देणारी भाजी आहे. नोव्हेंबरमध्ये पेरणीसाठी हवामान अनुकूल असल्यामुळे बी लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांत काढणी करता येते. एका एकरातून सरासरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. प्रति किलो २० ते २५ रुपये दराने विक्री केली तर दोन महिन्यांत ५० ते ७० हजार रुपयांचा नफा सहज मिळू शकतो.
advertisement
मेथी ही सर्वात लोकप्रिय आणि जलद वाढणारी पालेभाजी आहे. नोव्हेंबरमध्ये लागवड केल्यास २५ ते ३० दिवसांत मेथी काढणीस तयार होते. एका एकरात सुमारे ८ ते १० क्विंटल मेथी मिळते. स्थानिक बाजारात मेथीला ३० ते ४० रुपये किलो दराने मागणी असते. योग्य सिंचन आणि सेंद्रिय खत वापरल्यास एका एकरातून शेतकरी ६० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत निव्वळ नफा कमवू शकतात.
advertisement


