अमेरिकन बटाटामुळे शेतकरी होतायेत मालामाल, काय आहे या शेतीचा फॉर्म्युला?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भारतीयांच्या किचनमधील बटाटा हा सर्वात महत्त्वाचा आहे. सध्या भारतीय बाजारात अमेरिकन बटाट्याची चर्चा सुरू आहे. तो दिसायला काळा असतो आणि त्याचे गुण हा वेगळे असतात. विशेष म्हणजे या काळ्या बटाट्याची शेती करुन शेतकरी कमी कालावधीत मालामाल होऊ शकतो. त्यामुळे या काळ्या बटाट्याची शेती करण्याची योग्य पद्धत काय आहे, याचे फायदे कसे आहेत, हेच आपण जाणून घेऊयात. (अनुज गौतम, सागर, प्रतिनिधी)
मध्यप्रदेशच्या सागर येथील कृषीतज्ज्ञ आकाश चौरसिया यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सागरमध्ये काळ्या बटाट्याची लागवड केली आहे. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, याची शेती दक्षिण अमेरिकेत केली जाते. तीन महिन्यात याचे पीक येते. हा बटाटा वर काळ्या रंगाचा तर आतमध्ये गडद जांभळा असतो. या बटाट्याची चव अगदी सामान्य बटाट्यासारखी असते. मात्र, हृदयरोग, शुगर आणि लोहाची कमतरता असलेल्यांसाठी हा बटाटा रामबाण उपाय आहे.
advertisement
advertisement
advertisement
खुल्या शेतात म्हणजेच मोनो क्रॉपिंग पद्धतीने एकाच रांगेत 8 ते 9 इंच अंतरावर एक फूट रुंद आणि अर्धा फूटाची नाली बनवून या पिकाची पेरणी करावी. बटाटा प्लँटरच्या साहाय्याने उघड्यावरही याची पेरणी करता येते. तसेच बहुस्तरीय शेतीमध्ये चार फूट रुंद वाफ्यावर तीन रांगेत 8 ते 9 इंच अंतरावर आणि 2.5 ते 3 इंच खोलीवर पेरणी करावी.
advertisement