फक्त २ दिवस बाकी! चंद्रदेवाचे नक्षत्र गोचर, या राशींचा गोल्डन टाइम सुरू होणार, सुख समृद्धीसह पैसा मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा थेट परिणाम मानवाच्या जीवनावर होतो. या ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींना शुभ तर काहींना थोडेसे आव्हानात्मक परिणाम भोगावे लागतात.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा थेट परिणाम मानवाच्या जीवनावर होतो. या ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींना शुभ तर काहींना थोडेसे आव्हानात्मक परिणाम भोगावे लागतात. सर्व ग्रहांमध्ये चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. तो साधारणतः अडीच दिवस एका राशीत राहून पुढच्या राशीत प्रवेश करतो. त्यामुळे चंद्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर लगेच जाणवतो.
advertisement
advertisement
कन्या राशी - भरणी नक्षत्रातील चंद्राचे हे गोचर कन्या राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ ठरणार आहे. तुमच्या मनातील अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. विशेषतः गुंतवणूक आणि आर्थिक निर्णयांसाठी हा काळ उत्तम आहे. व्यवसायात नफा मिळेल आणि नवीन संधी प्राप्त होतील. अविवाहितांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
कर्क राशी - कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे हे संक्रमण आर्थिक आणि कौटुंबिक सुख वाढवणारे ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे या काळात पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा मान्यता मिळण्याचे योग आहेत. प्रवासाचे आणि नवीन ठिकाणी जाण्याचे योग संभवतात. आरोग्य उत्तम राहील आणि मन प्रसन्न राहील.
advertisement
तूळ राशी - तूळ राशीसाठी चंद्राचा भरणी नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायक आहे. या काळात सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. जुनी अडचण किंवा तणाव दूर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते किंवा करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो. आनंददायी बातम्या मिळतील, समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थैर्य राहील आणि कुटुंबात शुभकार्ये घडतील.
advertisement


