Road Accident: मंदिरात दर्शन घेऊन घरी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर, १५ भाविकांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Road Accident: रस्त्यावर रक्ताचा सडा, मृतदेहांचा खच, गाडीचा चक्काचूर, अंगावर काटा आणणारा भीषण अपघाताचा पहिला फोटो, उभ्या ट्रकमध्ये घुसला टेम्पो ट्रॅव्हलर, गाडीचा चक्काचूर, देवदर्शनाहून परतणाऱ्या 15 भाविकांचा मृत्यू
देवदर्शन मनोभावे आणि श्रद्धेनं झालं, आता घरी पोहोचण्याची ओढ लागली. मात्र प्रवासात असं काही घडलं की कुटुंब उद्ध्वस्त झाली. रविवार घातवार ठरला आणि देवदर्शन करुन निघालेल्या भाविकांसाठी काळ बनून आला. देवदर्शनाहून घरी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. पुढचा भाग ट्रकच्या आतमध्ये घुसला.
अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. मृतदेह पडले होते. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील 18 पैकी 15 भाविकांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ज्या क्षणी कुटुंबीय देवदर्शनाचा आनंद घेऊन घरी परतण्याची स्वप्ने पाहत होते, त्याच क्षणी ही हृदय हेलावून टाकणारी दुर्घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement

जोधपूर येथील सूरसागर भागातील रहिवासी असलेले हे सर्व १८ जण एका टेम्पो ट्रॅव्हलरने एकत्रित प्रवास करत होते. हनुमानसागर चौकाजवळ गाडी अत्यंत भरधाव वेगात होती. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला चालकाचा अंदाज आला नाही आणि टेम्पो ट्रॅव्हलर थेट ट्रकमध्ये जाऊन घुसला. धडक इतकी भयानक होती की, ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि गाडीचा लोखंडी सांगाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच फलोदी पोलीस, एसडीआरएफचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, टक्कर इतकी भीषण होती की अनेक मृतदेह गाडीच्या सीटमध्ये आणि लोखंडी भागांत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत पथकांना मोठे कष्ट घ्यावे लागले. या अपघातात १५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती फलोदीचे पोलीस अधीक्षक कुंदन कंवरिया यांनी दिली. सुदैवाने, गंभीर जखमी झालेल्या तीन प्रवाशांना तातडीने ओसियां रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, अधिक उपचारांसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करून जोधपुरला हलवण्यात आले आहे.
advertisement
या भीषण अपघाताच्या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) माध्यमातून तीव्र दुःख व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलरचा अतिवेग आणि कमी दृश्यमानता हे अपघाताचे मुख्य कारण असू शकते.
advertisement
एका कुटुंबाची धार्मिक यात्रा अशा दुःखद वळणावर संपावी, या घटनेने जोधपुरमधील सूरसागर भागावर शोकाची गडद छाया पसरली आहे. ज्यांच्यावर काळाने घाला घातला, त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींची निश्चिती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या दुर्घटनेने महामार्गावरील सुरक्षित प्रवासाच्या नियमांबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
view commentsLocation :
Rajasthan
First Published :
November 03, 2025 6:53 AM IST
मराठी बातम्या/देश/
Road Accident: मंदिरात दर्शन घेऊन घरी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर, १५ भाविकांचा मृत्यू


