Astrology 2026: वेळ आता आपली येणार! वर्ष 2026 सुरू होताच या राशींचा गोल्डन टाईम; बुध-शनि वक्री
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. मार्च 2025 पासून शनि मीन राशीत आल्यानं काही राशींवर साडेसाती आली आणि काहींची गेली. शनि अद्याप भरपूर काळ मीन राशीत राहणार आहे. तेथून तो राशींना शुभ-अशुभ प्रभाव दाखवत राहील. ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, मित्रत्त्वाचा कारक मानला जातो. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीतील बदल 2026 मध्ये काही राशींवर पाहायला मिळेल.
advertisement
वृषभ - शनि आणि बुधाची स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनि तुमच्या राशीत उत्पन्न आणि नफ्याच्या घरात असेल, या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीय वाढू शकते. तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून देखील पैसे कमवू शकता. हा नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय नफा आणेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे.
advertisement
advertisement
मकर - शनी आणि बुध ग्रहाची सरळ चाल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. शनि तुमच्या राशीत, धैर्य आणि शौर्याच्या स्थानात मार्गी असेल, तर बुध तुमच्या अकराव्या घरात मार्गी असेल. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य-शौर्य वाढेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता देखील आहे. या काळात नवीन संधी निर्माण होतील आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.
advertisement
advertisement
कर्क - शनि आणि बुध ग्रहाची सरळ चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमची रखडलेली कामे 2026 मध्ये पूर्ण होतील. मानसिक संतुलन राखले जाईल, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात समाधान राहील. या काळात तुमच्या सर्जनशील योजना आणि गुंतवणूक फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही देश-विदेशात प्रवास देखील करू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


