Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवामध्ये बाप्पाला अर्पण करावीत या 5 प्रकारची फुलं; सुखाचं वरदान मिळतं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ganesh Chaturthi 2025 flowers: पूजा म्हटलं की फुलं हवीतच, त्याचप्रमाणं गणेश पूजेमध्ये फुलांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. गणपती बाप्पांना अनेक प्रकारची फुले अर्पण केली जातात आणि प्रत्येक फुलाचे स्वतःचे असे एक खास महत्त्व आहे. फुलांच्या वापरामुळे पूजेला एक आध्यात्मिक आणि सुंदर रूप येते. सभोवताली अध्यात्मिक वातावरण फुलांमळेच तयार होते. खरंतर फुलं निसर्गाची देणगी आहेत आणि ती शुद्धतेचे प्रतीक मानली जातात. पूजेमध्ये फुलांचा वापर केल्यानं वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक बनतं. फुलांचा सुगंध आणि सौंदर्य मन शांत करतं, आपल्या पूजेमध्ये त्यानं एकाग्रता वाढते. ज्योतिषाचार्य अंशुल त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री गणेशाच्या पूजेसाठी कोणती 5 फुले वापरणे शुभ ठरते, याबाबत जाणून घेऊ.
झेंडूची फुले - झेंडूचे फूल गणेशाला सर्वात आवडते, असे मानले जाते. पूजेदरम्यान भाविक गणपती बाप्पाला झेंडूची माळ घालतात. शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की, गणेशाला झेंडूची फुले अर्पण केल्यानं आरोग्याला फायदा होतो, आरोग्य लाभते. यासोबतच, असेही मानले जाते की झेंडूची फुले अर्पण केल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते, पैशाच्या समस्या दूर होतात. झेंडूच्या फुलाचा पिवळा आणि नारंगी रंग ऊर्जा, प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक असून तो जीवनात नवीन उत्साह आणि आनंद आणतो.
advertisement
जास्वंदीची फुले - गणेशाचे पूजेसाठी लाल फुलाचे विशेष महत्त्व आहे. हे फूल शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. गणेशाला जास्वंदीचं फुल अर्पण केल्याने व्यक्ती त्याच्या शत्रूंवर विजय मिळवते. जीवनात येणाऱ्या अडचणी संपतात, यशाचे नवीन मार्ग उघडतात. जास्वंदीमुळे घरात समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा संपतात.
advertisement
पारिजात फुले - पारिजाताचा सुगंध पवित्रतेसाठी प्रसिद्ध आहे. श्री गणेशाला पारिजात फुले अर्पण केल्याने संतती सुख मिळते. ज्या जोडप्यांना त्यांच्या आयुष्यात मुले होण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी गणेश चतुर्थीला पारिजात फुले अर्पण करावीत. गणेशाला ते खूप प्रिय असून त्यांच्या कृपेने मुलांशी संबंधित समस्या दूर होतात, असे मानले जाते.
advertisement
advertisement
अपराजिता फुले - अपराजिता फूल हे नावाप्रमाणेच विजय आणि यशाचे प्रतीक आहे. ज्यांच्या लग्नात सतत अडचणी येत आहेत किंवा त्यांचे लग्न उशिरा होत आहे, गणरायाला अपराजिता फुले अर्पण करावीत. गणराय प्रसन्न होऊन विवाहातील सर्व अडचणी दूर करतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


