Shravan: महादेवाच्या सगळ्यात प्रिय राशींमध्ये तुम्ही आहात? यंदाच्या श्रावणात चांगले दिवस, विवाह ठरणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Marathi Shravan 2025 : श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि विशेष मानले जाते. या महिन्यात उत्साहाने लोक महादेवाची पूजा करतात, या काळात धार्मिक व्रत, उपवास आणि पूजा-अर्चांना खूप महत्त्व दिले जाते. श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष शंकराने प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले. हे विष पचवण्यासाठी त्यांना शीतलता आवश्यक होती, ती श्रावण महिन्यात पर्जन्यवृष्टीमुळे मिळते असे मानले जाते. म्हणूनच या महिन्यात शिवावर जलाभिषेक केल्याने ते लवकर प्रसन्न होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
advertisement
advertisement
मकर - मकर राशीचा स्वामी शनि आहे, तो महादेवाचा भक्त आहे. महादेव मकर राशीच्या लोकांवर कृपा करतात. श्रावणात या लोकांच्या जीवनात सकारात्मकता वाढेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. श्रावण सोमवारी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करणे फायदेशीर ठरेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


