Money Mantra: गुरुवारला नवरात्राची सुरुवात लकी! या राशींना मिळणार भाग्याची साथ; आर्थिक लाभ
- Written by:Bhoomika Kalam
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं गुरुवारच्या दिवसाचं (03 ऑक्टोबर 2024) राशीभविष्य
advertisement
advertisement
मिथुन (Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष असेल. कारण व्यवसायात काही तरी नवं करण्याचा विचार आज कराल आणि त्यातून निश्चित फायदा होईल. एखादं कर्ज सुरू असेल, तर परतफेडीमध्ये आज थोडं यश येईल. कामासंदर्भात मनात नवीन नियोजन सुरू कराल. आज काही तरी नवं शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल; पण अनावश्यक खर्च टाळा.उपाय : पांढरे कपडे, पीठ, तांदूळ, साखर यांसारख्या वस्तू दान करा.
advertisement
advertisement
सिंह (Leo) : व्यवसायात आज नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचा भविष्यात फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यात तुम्हाला यश येईल. त्यामुळे तुमची भविष्याविषयीची चिंता कमी होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये काही आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मित्रांच्या सहकार्याने अनुकूल वातावरण तयार करता येईल. समजूतदारपणा आणि विवेकाच्या आधारे तुम्ही घेतलेल्या निर्णयात तुम्हाला यश मिळेल.उपाय : लक्ष्मीला बत्तासे, मखाणे आणि कवड्या अर्पण करा.
advertisement
advertisement
तूळ (Libra) : राजकीय स्पर्धेत यश मिळेल आणि तुमचं कामही वेळेत पूर्ण होईल. एखादं कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आज ते सहज घेता येईल. नोकरदार व्यक्तींच्या अधिकारांमध्ये वाढ होईल. वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर खूश असतील; पण संध्याकाळी कोणत्याही वादविवादात अडकू नका. तो वाद कोर्टात जाऊ शकतो.उपाय : घराच्या मुख्य दरवाज्यावर गुलालाची उधळण करून दोन वातींचा दिवा लावावा.
advertisement
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस वेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरेल. सासरकडच्या एखाद्या व्यक्तीला पैसे कर्जाऊ दिले असतील, तर ते आज मिळतील. व्यवसायात जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासंदर्भात आज प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. आज अनपेक्षितरीत्या एखादा नेता किंवा मोठ्या अधिकाऱ्याची भेट घडेल.उपाय : लक्ष्मीमातेला केशर घातलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवा.
advertisement
advertisement
मकर (Capricorn) : तुमची क्षमता आज वाढेल. त्यामुळे तुमची प्रसिद्धी सर्वत्र होईल आणि तुमच्या शत्रूंचा नाश होईल. व्यवसायात कोणताही आर्थिक व्यवहार करण्याबाबत सावधगिरी बाळगा. अन्यथा पैसे अडकून पडण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज नव्या संधी मिळतील.उपाय : लक्ष्मीची उपासना करा आणि शमीपत्रं वाहा.
advertisement
advertisement









