Numerology: भयंकर त्रासदायक, पटवून न घेणारी माणसं शक्यतो या 3 तारखांना जन्मलेली असतात; मूळ स्वभावच..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: प्रत्येक व्यक्तीची एक मूलांक संख्या असते, जन्मतारखेवरून मूलांक संख्या काढली जाते. मूलांकावरून व्यक्तीची अनेक गुपिते जाणून घेऊ शकतो. मूलांकावरून त्या व्यक्तीच्या आवडी-निवडींबद्दल देखील जाणून घेता येतं. काही लोकांचे स्वभाव फार विचित्र, रागीट, फारच शांत, पूर्ण खुलं मन, अशा विविध प्रकारचे असतात. आज आपण मूलांक 5 असलेल्या लोकांबद्द्ल जाणून घेऊया.
advertisement
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या जन्मतारखांच्या लोकांना प्रेम जीवनात अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागते. त्यांना खरे प्रेम मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांचं प्रेम नसतं किंवा इच्छा कमी असते, अशा गोष्टी नसतात. परंतु त्यांना प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता राखणं कठीण जातं. कधीकधी ते त्यांच्या जोडीदाराशी फार खेळीमेळीनं राहतात आणि लगेच बिनसतात पण. या लोकांना प्रेमात संयम आणि समजूतदारपणाची आवश्यकता असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मूलांक 5 असलेल्या लोकांचा प्रेमात संघर्ष होण्याची शक्यता असते, परंतु त्यांना योग्य वेळी योग्य व्यक्ती सापडते तेव्हा त्यांचे जीवन आनंदी आणि स्थिर होते. त्यांना फक्त संयम आणि समजूतदारपणाने प्रेम करण्याची आवश्यकता असते आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंद आणि समाधानी राहू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


