March Astrology: कोणी अडवू शकणार नाही! मार्चमध्ये डबल राजयोगात या राशी दुप्पट कमावणार, धनलाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budhaditya And Shukraditya Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला राशी राशी परिवर्तन करत असतो, त्याचा परिणाम संपूर्ण राशीचक्रावर पाहायला मिळतो. राशीपरिवर्तनात सूर्य कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग करतो, ज्यामुळे काही शुभ योग निर्माण होतात. मार्च महिन्यात धूलिवंदन दिवशी म्हणजेच 14 मार्च 2025 रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल, तिथे शुक्र आणि बुध आधीच उपस्थित आहेत.
advertisement
वृषभ - या राशीत बुध-रवि आणि शुक्र-रवि यांची युती अकराव्या घरात होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. यासोबतच अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात मोठ्या प्रगतीची शक्यता आहे.
advertisement
वृषभ - व्यवसायात तुम्ही बनवलेल्या रणनीती फायदेशीर ठरू शकतात. प्रचंड नफा कमवू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. हुशारीने खर्च केलात तर अधिक चांगले होईल. तुम्ही पैसे देखील वाचवाल. वैवाहिक आणि प्रेम जीवन चांगले राहणार आहे. नात्यात गोडवा राहील. यासोबतच, बौद्धिक क्षमता वेगाने वाढणार आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींची काळजी घेतली तर तुमचे आरोग्य चांगले राहील.
advertisement
advertisement
advertisement
तूळ - मीन राशीत तयार होणारे शुक्रादित्य आणि बुधादित्य योग या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतात. हे शक्तिशाली राजयोग नवव्या घरात तयार होत आहेत. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्ही आता करत असलेल्या कामात यश मिळवू शकता. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल. यासोबतच, तुम्ही कामासाठी अधिक वेळ द्याल, ज्यामुळे तुम्हाला खूप यश मिळू शकेल.
advertisement
तूळ - कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होतील, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. पैशाच्या बाबतीतही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. आरोग्यातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










