Aajache Rashibhavishya: रविवारी गुड न्यूज मिळणार, या राशींचं नशीब पालटणार, पाहा आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: आजचा रविवार काही राशींसाठी गुड न्यूज घेऊन येणार आहे. तर काही राशींसाठी नवी आव्हाने निर्माण करेल. मेष ते मीन राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
वृषभ- तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच; परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धीचे ठरतील असे प्रकल्प तुम्ही हाती घ्यायला हवेत. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल. कुणाची साथ न मिळवता आजच्या दिवशी तुम्ही भरपूर आनंद मिळवू शकाल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. खाजगी आणि गोपनीय माहिती अजिबात उघड करू नका. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
कर्क राशी - आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. तुमचे व्यक्तिमत्त्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. आज अविवाहित मंडळींना आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
सिंह राशी - चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
कन्या राशी - आज आर्थिक पक्ष चांगले राहील; परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
तूळ राशी - इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल; परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. आज तुम्ही राहिलेली सर्व कामे पूर्ण करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल - किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. आज तुम्हाला प्रवासाचा योग आहे आणि त्यासाठी कंटाळा तुम्ही करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
कुंभ राशी - अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस असणार आहे. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. विवाहित जीवनात आज आनंदाची बातमी आपल्या जोडीदाराकडून भेटण्याची दाट शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
मीन राशी - ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. आपल्या लोकांशी संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement


