Astrology: बिकट काळ खूप सोसला! आता चमकणार या 5 राशींचे भाग्य; शनी-राहुची कृपादृष्टी
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल मंगळवारचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा मंगळवारचं दैनिक राशीभविष्य 12 नोव्हेंबर 2024..
मेष (Aries): आज आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवावे लागतील. तुमच्या मनात विविध त्रासदायक विचार येऊ शकतात. कौटुंबिक समस्यांबद्दलही तुम्हाला काळजी वाटू शकते. त्यामुळे, संवाद साधल्याशिवाय विनाकारण अस्वस्थ होऊ नका. अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांनी मन लावून काम करतील. आर्थिक बाबतीत फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकता. पण, स्वकमाई खर्च होण्याची शक्यता असल्याने तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आज तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवाल. मन शांत राहील.
Lucky Number: 7
Lucky Color: Yellow
Lucky Number: 7
Lucky Color: Yellow
advertisement
वृषभ (Taurus): आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला राहील. मनात विचारांचं काहुर निर्माण होऊ शकतं. एखाद्या कौटुंबिक समस्येमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. संवाद न साधता अस्वस्थ होण्यापेक्षा बोलून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल. नोकरदार मन लावून काम करतील आणि तुम्हाला आर्थिक बाबतीत फायदा होईल. आज तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार खर्च करण्याची संधी मिळेल आणि स्वकमाई खर्च करून तुम्हाला समाधान मिळेल. तुमचा दिवस आनंदात जाईल आणि तुम्हाला यशाकडे जाण्याची संधी मिळेल. स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रशासकीय कामात यश मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल. आज आरोग्याची काळजी घ्यावी.
Lucky Number: 12
Lucky Color: Red
Lucky Number: 12
Lucky Color: Red
advertisement
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या कार्यपद्धतीने तुम्ही वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल. तुमचा बॉस तुमच्या कामाचं कौतुक करू शकतो. वैयक्तिक संबंधांसाठी आजचा दिवस चांगला असेल. लोकांना भेटल्याने आणि संवाद साधल्याने तुमच्या मैत्रीला आणि प्रेमसंबंधांना नवीन उंची मिळू शकते. आरोग्य सामान्य असेल. व्यवसायात नवीन योजनांचा अवलंब करून आपलं काम पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. कामात गुंतून राहून तुम्ही ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या नात्यात प्रेम आणि आनंद टिकून राहील.
Lucky Number: 10
Lucky Color: Maroon
Lucky Number: 10
Lucky Color: Maroon
advertisement
कर्क (Cancer) : कर्क राशीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या विचारांवर आणि कृतींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. आर्थिक गोष्टींबाबत काळजी घ्यावी लागेल. आर्थिक परिस्थिती समजून घेणं आणि त्यानुसार गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जोडीदाराशी आणि कुटुंबाशी संवाद साधण्याची गरज आहे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहाराकडेही लक्ष द्यावं लागेल जेणेकरून तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. तुमची कामं वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन संतुलित ठेवावं लागेल.
Lucky Number: 4
Lucky Color: Orange
Lucky Number: 4
Lucky Color: Orange
advertisement
सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळेल. लग्नाबद्दल बोलणी सुरू असेल तर त्यावर आज शिक्कामोर्तब होऊ शकतो. तुमच्या घरात शुभ कार्याचे आयोजन होऊ शकतं. नातेवाईकांमध्ये तुमची विश्वासार्हता वाढेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आनंददायी दिवस घालवण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला नवीन गोष्टी खरेदी करण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ते संशोधनात जास्त वेळ घालवतील. तुम्ही नवीन ठिकाणांहून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचं ज्ञान इतरांशी शेअर करण्यात यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. आयुष्यात नवीन उंची गाठण्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतील.
Lucky Number: 8
Lucky Color: White
Lucky Number: 8
Lucky Color: White
advertisement
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नसेल. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करावं लागेल आणि काळजीपूर्वक वाटचाल करावी लागेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठं नुकसान टाळण्यासाठी जास्त काळजी घ्यावी लागेल. तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं लागेल. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला आहाराची आणि व्यायामाचीही काळजी घ्यावी लागेल. नवीन काम सुरू करण्यासाठी आजची वेळ योग्य नाही. तुम्हाला तुमच्या जुन्या कामावर लक्ष केंद्रीत करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. संयम आणि सहनशीलता ठेवावी लागेल. आजूबाजूच्या लोकांपासून दूर राहावं लागेल.
Lucky Number: 14
Lucky Color: Navy Blue
Lucky Number: 14
Lucky Color: Navy Blue
advertisement
तूळ (Libra) : आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला असेल. तुम्हाला तुमच्या कामात यश आणि आर्थिक लाभ दोन्हीही मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि नातेवाईकांशी वाद टाळावा लागेल. कामावर अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरदारांनी आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावं. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि बॉसशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवू शकता आणि पैसेही खर्च करू शकता. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. तुम्हाला त्यात यश मिळेल. सिंगल लोकांना आज लग्नासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. जोडीदारासोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा सल्ला दिला जातो. आज तुम्ही नवीन वाहन किंवा काही घरगुती वस्तू खरेदी करू शकता.
Lucky Number: 6
Lucky Color: Magenta
Lucky Number: 6
Lucky Color: Magenta
advertisement
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नसेल. आज तुम्हाला प्रत्येक कामात सावध राहावं लागेल. आपल्या विरोधकांपासून सावध राहा. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये. आज प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून तुम्ही तुमच्या कुटुंबातील वाद टाळू शकता. रागामुळे गोष्टी बिघडू शकतात. खर्च करताना काळजी घ्यावी कारण, तुम्हाला पैशांची कमतरता जाणवू शकते. मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याची गरज आहे. मिळालेला मोकळा वेळ आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वापरावा. विद्यार्थ्यांना आज अभ्यासातून विश्रांती घेण्याची संधी मिळू शकते.
Lucky Number: Blue
Lucky Color: 3
Lucky Number: Blue
Lucky Color: 3
advertisement
धनू (Sagittarius) : धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अयोग्य असेल. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. विचाराची स्पष्टता ठेवून इतरांना सहकार्य करावं लागेल. आज नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करणं टाळावं लागेल. आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळावेत. आज आरोग्याकडेही लक्ष द्यावं लागेल. आहार आणि व्यायाम यांचं संतुलन ठेवावं लागेल. तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा आणि त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा. मन शांत ठेवण्यासाठी लक्ष केंद्रीत करावं लागेल. स्वतःला निरोगी आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज आजूबाजूच्या लोकांशी चांगलं वागलं पाहिजे.
Lucky Number: 11
Lucky Color: Pink
Lucky Number: 11
Lucky Color: Pink
advertisement
मकर (Capricorn) : मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरदारांना बढती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. तुमच्या मालमत्तेशी संबंधित तडजोड होण्याची शक्यता आहे. जर कोर्टात केस सुरू असेल तर निकाल तुमच्याबाजूने लागू शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू घेऊ शकता. तुम्हाला स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आहाराची काळजी घ्या जेणेकरून कोणत्याही आजाराचा सहजपणे सामना करता येईल. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आनंद आणि समृद्धी मिळेल. तुम्ही स्वत:च्या इच्छा आणि ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
Lucky Number: 2
Lucky Color: Brown
Lucky Number: 2
Lucky Color: Brown
advertisement
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात भरपूर यश मिळेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला नातेवाईकांकडून काही खास भेटवस्तू मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या वैवाहिक जीवनातही प्रेमाचा वर्षाव होईल. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरदार आज आपल्या कामात खूप व्यग्र असतील आणि त्यांच्या कामाचं कौतुकही होईल. सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. अतिउत्साहाने कोणतेही काम करू नका. गरजेची कामं वेळेत पूर्ण करा.
Lucky Number: 11
Lucky Color: Sky Blue
Lucky Number: 11
Lucky Color: Sky Blue
advertisement
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. तुम्हाला अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो आणि कामात यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. आर्थिक स्थिती देखील फारशी चांगली नसेल. खर्चाकडे लक्ष द्यावं लागेल. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित लोकांना आज सावध राहावं लागेल आणि नको असलेले वाद टाळावे लागतील. नातेवाईकांशी वागताना देखील सावध राहा आणि त्यांच्याशी वाद टाळा. आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल आणि खर्चाचं नियोजन कराव लागेल. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. मनोरंजनाच्या साधनांकडे लक्ष द्यावं लागेल.
Lucky Number: 5
Lucky Color: Green
Lucky Number: 5
Lucky Color: Green