Tulsi vivah 2025: तुळशी विवाहालाच शुक्र-चंद्राचं राशी परिवर्तन! अनपेक्षित नशिबाची साथ 3 राशींना
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi vivah 2025: यंदा तुळशी विवाह आज 2 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाईल. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. या शुभ मुहूर्तावर माता तुळशी आणि श्रीकृष्ण यांचा विवाह मोठ्या उत्साहाने पार पाडला जातो. असे मानले जाते की, या दिवशी माता तुळशीचे कन्यादान केल्याने घरात सुख-समृद्धीचा वास होतो.
ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने, यंदाचा तुळशी विवाह खूप खास मानला जात आहे. कारण तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्र ग्रह तूळ राशीत आणि चंद्रमा मीन राशीत प्रवेश करेल. शुक्र आणि चंद्राचे हे गोचर ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जातेय. जाणून घेऊया तुळशी विवाहाच्या दिवशी होणाऱ्या शुक्र आणि चंद्राच्या गोचरामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
तूळ - तुळशी विवाहावर होणाऱ्या शुक्र-चंद्राच्या गोचरामुळे तूळ राशीच्या लोकांचे नशीब चमकेल. त्यांच्या विवाह आणि लग्नसंबंधात येणारे सर्व अडथळे दूर होतील. मालमत्ता (प्रॉपर्टी) मध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल आणि घर-परिवारात कोणतीही शुभ वार्ता प्राप्त होईल. व्यवसायासाठी हा काळ खूप चांगला मानला जात आहे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल, तसेच त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ जाणवेल.
advertisement
मीन - तुळशी विवाहावर होणाऱ्या शुक्र-चंद्राच्या गोचरामुळे मीन राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल. त्यांना कार्यक्षेत्रात मनासारखे यश मिळू शकते. नवीन नोकरीचा प्रस्ताव प्राप्त होऊ शकतो आणि नोकरीत पदोन्नतीचा योगही बनत आहे. मित्रांसोबतचे नाते अधिक मजबूत होईल आणि आर्थिक लाभ प्राप्त होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


