Bajaj: पैसे छापायची मशीन! कारसारखे फिचर्स आणि कमाईसाठी बेस्ट अशी बजाजची GoGo P7012
- Published by:sachin Salve
Last Updated:
रोजच्या प्रवासातला महत्त्वाचा भाग असलेला रिक्षा सुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. बजाजने यामध्ये बाजी मारली आहे. बजाजच्या GoGo P7012 नावाच्या इलेक्ट्रिक रिक्षाने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
भारतात सध्या ईलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे कल वाढत चालला आहे. स्कुटर, दुचाकी किंवा कार असेल सगळ्याच प्रकारामध्ये उत्तम रेंज देणारी इलेक्ट्रिक वाहनं बाजारात उपलब्ध आहे. एवढंच नाहीतर मालवाहू वाहनं सुद्धा आता ईलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पाहण्यास मिळत आहे. अशातच रोजच्या प्रवासातला महत्त्वाचा भाग असलेला रिक्षा सुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. बजाजने यामध्ये बाजी मारली आहे. बजाजच्या GoGo P7012 नावाच्या इलेक्ट्रिक रिक्षाने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. कारसारखे फिचर्स आणि दमदार रेंजमुळे ही रिक्षा अल्पवधीतच अनेक घरांचं आर्थिक कमाईचं साधन ठरलं आहे.
advertisement
बजाज गोगो पी७०१२ पॅसेंजर ई-ऑटोच्या जोरदार मागणीमुळे एप्रिल २०२५ मध्ये बजाज ऑटोने भारतातील इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर बाजारात अव्वल स्थान मिळवलं आहे. वाहन पोर्टलवरील आकडेवारीनुसार, बजाज ऑटोने एप्रिलमध्ये ५,५०६ इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनं विकली, जी या सेगमेंटमध्ये सर्वाधिक आहे. बजाजची ही रिक्षा आता नंबर १ ब्रँड बनली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
P5009, P5012 आणि P7012 मध्ये P म्हणजे पॅसेंजर आणि 50 आणि 70 आकार दर्शवितात. शेवटी, 09 आणि 12 म्हणजे 9 kWh आणि 12 kWh बॅटरी यामध्ये दिली आहे. बजाजने GoGo P5009 ची किंमत 3,26,797 रुपये (एक्स-शोरुम) इतकी ठेवली आहे. यामध्ये 12 kWh बॅटरी पर्याय दिला आहे. तर GoGo P7012 ची किंमत 3,83,004 रुपये (एक्स-शोरुम) इतकी आहे.