EV Car: सोसायटीत EV चार्जर लावून घ्या! ईलेक्ट्रिक कार होणार CNG गाड्यांपेक्षा स्वस्त, केंद्र सरकारने दिले संकेत
- Published by:Sachin S
Last Updated:
जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असेल तर थांबा! कारण, आता जीएसटीमुळे आधीच इंधनावरील कारच्या किंमती कमी झाल्या आहे. आता लवकरच
जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असेल तर थांबा! कारण, आता जीएसटीमुळे आधीच इंधनावरील कारच्या किंमती कमी झाल्या आहे. आता लवकरच ईलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती या सध्याच्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या किंमतीपर्यंत येतील, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
advertisement
एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ईलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं. 'पुढील चार ते सहा महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या किमती इतक्या होतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे, त्यामुळे हे आता लवकरच शक्य आहे, असं गडकरींनी सांगितलं.
advertisement
advertisement
नितीन गडकरींनी ट्रॅक्टर उत्पादक आणि कृषी संशोधकांशी झालेल्या बैठकीत त्यांनी स्वच्छ ऊर्जा उपकरणांवर काम वेगवान करण्याचे आवाहन केलं आहे. गडकरींनी इथेनॉल, सीएनजी किंवा आयसोब्युटनॉल सारख्या पर्यायी इंधनांवर चालणारे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इंजिन विकसित करण्याचा सल्ला दिला. या नवकल्पनांमुळे भारताला स्वावलंबी बनण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, ते डिझेल आयात आणि प्रदूषण कमी करतील, यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढण्यास देखील मदत होईल, असंही गडकरींचं म्हणणं आहे.
advertisement
सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहने हा एक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय असू शकतो. कमी बॅटरीच्या किमतींमुळे केवळ वाहनांच्या किमती कमी होणार नाहीत तर इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढेल. भारतातील अनेक कंपन्या आधीच इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार तयार करतात आणि सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी आणि सवलती देत आहे.
advertisement
advertisement
याव्यतिरिक्त, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसारखी उपकरणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. ही परवडणारी आणि पर्यावरणपूरक असतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. जर तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा, कारण पुढील काही महिन्यांत इलेक्ट्रिक वाहने तुमच्या बजेटमध्ये येऊ शकतात.