Driving tips: दाट धुक्यात घेतली नाही काळजी तर होऊ शकतो अपघात! ड्रायव्हिंग करताना अवश्य लक्षात ठेवा या टिप्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
How To Drive In Fog: दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून दाट धुकं आहे. धुकं इतकं आहे की लोकांना वाहन चालवताना त्रास होतोय. तुम्ही तुमच्या कारने रस्त्यावर जाता तेव्हा तुम्हाला 3-4 मीटरच्या पुढे काहीही स्पष्ट दिसत नाही. अशा वेळी कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोकाही वाढतो. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही दाट धुक्यातही सुरक्षितपणे गाडी चालवू शकाल.
हेडलाइट्स आणि ब्लिंकर ठेवा ऑन: धुक्यात गाडी चालवताना हेडलाइट्स आणि हॅझर्ड ब्लिंकर लाइट्स चालू ठेवा. यामुळे इतर वाहनांना तुम्हाला ओळखण्यास मदत होईल. दाट धुक्यातही काही अंतरावरून लाल दिवा दिसतो. यामुळे तुमच्या गाडीची व्हिजिबिलिटी वाढेल आणि अपघाताचा धोका कमी होईल. याशिवाय समोरून येणाऱ्या वाहनांना त्रास होऊ नये म्हणून हेडलाइट्स कमी बीमवर ठेवा. तुमच्या कारमध्ये फॉग लॅम्प असेल तर तोही ऑन ठेवा.
advertisement
तुमच्या लेनमध्ये करा ड्रायव्हिंग: धुक्यासारख्या परिस्थितीत महामार्गावर वाहन चालवताना वारंवार लेन बदलण्याची चूक करू नका. कमी व्हिजिबिलिटीमुळे तुमची कार इतर वाहनांना धडकू शकते. तुम्ही सिंगल लेन रस्त्यावर गाडी चालवत असाल तर रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना टक्कर होणे टाळता येईल.
advertisement
advertisement
विंडशील्ड आणि खिडक्या स्वच्छ ठेवा: कारचे विंडशील्ड, खिडक्या आणि मागील व्ह्यू मिरर स्वच्छ ठेवून गाडी चालवणे तुम्हाला सोपे जाईल. याच्या मदतीने तुम्ही आजूबाजूचे वातावरण सहज पाहू शकाल. हिवाळ्यात, कारच्या विंडशील्डवर ओलावा जमा होतो ज्यामुळे समोरचे स्पष्टपणे दिसत नाही. असे झाल्यास, कारचे डीफ्रॉस्टर वापरा किंवा ओलावा काढून टाकण्यासाठी कापड वापरा.
advertisement
advertisement
ब्रेक आणि टायर चांगल्या स्थितीत ठेवा: ब्रेक आणि टायर चांगल्या स्थितीत असणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही ब्रेक लावाल तेव्हा तुमची कार योग्य वेळी थांबेल. जर ब्रेक लूज असेल तर ब्रेक लावल्यास गाडी वेळेत थांबणार नाही. त्याच वेळी, टायर घासलेले असतील तर अधिक स्पीडमध्ये ब्रेक लावल्लायस टायर स्लीप होऊ शकतात.
advertisement