Maruti ची 21 किमी मायलेज देणारी जबरदस्त कार, पण बंद करण्याची आली वेळ, हे कारण समोर
- Published by:sachin Salve
Last Updated:
मारुतीची कार सगळ्यात जास्त मायलेज देण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे मारुतीच्या कारची सर्वाधिक विक्री असते. पण मारुती सुझुकीने आपली दमदार मायलेज देणारी कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
मारुतीची कार सगळ्यात जास्त मायलेज देण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे मारुतीच्या कारची सर्वाधिक विक्री असते. पण माारुतीची CIAZ ही त्याला अपवाद ठरली आहे. मागील महिन्यात फक्त 590 सियाज कारची विक्री झाली. त्यामुळे कमी प्रमाणात विक्री झाल्यामुळे मारुतीने CIAZ कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून CIAZ कारचं उत्पादन कायमस्वरुपी बंद होणार आहे.
advertisement
Ciaz ही मारुती सुझुकीची सेडान सेगमेंटमध्ये कार होती. बिझनेस क्लासमधील नोकरदारांना समोर ठेवून ही कार तयार करण्यात आली होती. 2022 मध्ये जेव्हा ही कार लाँच झाली तेव्हा 15869 कारची विक्री झाली होती. त्यानंतर २०२३ मध्ये 13,610 यूनिटची विक्री झाली. त्यानंतर पुढील वर्षी २०२४ मध्ये या कारच्या विक्रीमध्ये आणखी घट झाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement