Tesla करणार लवकरच मार्केट जाम, महाराष्ट्रात या ठिकाणी सुरू चाचणी, पहिला PHOTO
- Published by:sachin Salve
Last Updated:
टेस्ला जर भारतात आली तर तिची टक्कर थेट महिंद्रा, बीवायडी आणि टाटा सारखे ब्रँडशी असणार आहे. अलीकडे टेस्लाने मुंबई ऑफिसही थाटलं आहे तर आता टेस्ला मॉडेल Y आणि मॉडेल 3 EV भारतात लाँच करणार हे कन्फर्म झालं आहे.
एकीकडे अमेरिकेकडून टॅरिफ वॉर सुरू आहे. तर दुसरीकडे भारतात एलन मस्क यांची टेस्ला कार लवकरच भारतात लाँच होणार आहे. टेस्ला जर भारतात आली तर तिची टक्कर थेट महिंद्रा, बीवायडी आणि टाटा सारखे ब्रँडशी असणार आहे. टेस्ला भारतीय ईव्ही बाजारपेठेवरही लक्ष ठेवून आहे आणि शक्य तितक्या लवकर या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. अलीकडे टेस्लाने मुंबई ऑफिसही थाटलं आहे तर आता टेस्ला मॉडेल Y आणि मॉडेल 3 EV भारतात लाँच करणार हे कन्फर्म झालं आहे
advertisement
अलीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेस्ला मॉडेल वाय चाचणी करताना दिसली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेस्ला मॉडेल वायची चाचणीही कुणाच्याा नजरेस पडू नये अशी घेण्यात येत आहे. टेस्ला भारतात नवीनतम मॉडेल Y फेसलिफ्ट आणत आहे आणि ते खूपच दमदार असंच आहे. टेस्लाने जुन्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलऐवजी नवीन मॉडेल आणण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रँडने मुंबईतील बीकेसी आणि दिल्लीतील एक शोरूम भाड्याने घेण्यासाठी करार केला आहे. अशा वाहनांवरील आयात शुल्क कमी केल्यानंतर, अमेरिकेतील ब्रँडला त्याचा निश्चितच फायदा होईल. याव्यतिरिक्त, टेस्ला इतर भारतीय उत्पादकांप्रमाणेच त्यांची वाहने विकू शकेल.
advertisement
प्री-फेसलिफ्ट टेस्ला मॉडेल Y प्री-फेसलिफ्ट टेस्ला मॉडेल Y ही मॉडेल 3 ची SUV सेगमेंट प्रकारासारखेच आहे. नवीन मॉडेल Y आता पूर्णपणे नवीन डिझाइन आणि फिचर्ससह तयार केले आहे. सुरुवातीला, त्यात नवीन सायबरट्रक-प्रेरित डीआरएल, सुधारित बोनेट आणि फ्रंट बंपर, नवीन टेललाइट डिझाइन आणि अलॉय व्हील डिझाइन (१९-इंच किंवा २०-इंच व्हिल) आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement