HSRP नंबरप्लेट 'या' गाड्यांना लावण्याची नाही गरज; पाहा तुमची गाडी त्यामध्ये येते का? नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
- Published by:Devika Shinde
Last Updated:
HSRP नंबरप्लेटचा नियम लागु झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जसे की HSRP म्हणजे नक्की काय? ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही? ते का गरजेचं आहे? ते कसं करायचं? त्यासाठी खर्च किती? आज आम्ही याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली, या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला HSRP नंबरप्लेट सक्तिचं करण्यात आलं आहे. यासाठी गाडी मालकांना मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती जी आता एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात येत आहे. जर तोपर्यंत ही HSRP लावलं गेलं नाही तर नियमांनुसार दंड आकारला जाईल.
advertisement
advertisement
<strong>HSRP म्हणजे काय? (what is HSRP number plate)</strong>HSRP चा फूल फॉर्म आहे High Security Registration Plate (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट). ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-कोड आणि स्थायिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो.
advertisement
<strong>HSRP कोणत्या गाड्यांसाठी आवश्यक आहे? (HSRP required for which vehicles)</strong>सरकारच्या नियमानुसार, ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्यांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे.दोन चाकी (बाईक, स्कूटर)चार चाकी (कार, एसयूव्ही, जीप)कमर्शियल वाहन (ट्रक, बस, ऑटो रिक्षा)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


