Toyota ची होती शान, प्रत्येक घरासाठी होती अभिमान; अचानक Innova आली अन् ती बंद झाली!
- Published by:sachin Salve
Last Updated:
काही गाड्या मध्यमवर्गीय फॅमिलीच्या खास राहिल्या तर काही गाड्या डोकेदुखी ठरल्यात. पण टोयाटोची अशी एक ७ सीटर एमपीव्ही होऊन गेली त्या कारला आजही कुणी विसरू शकत नाही.
फॅमिलीसाठी कार कशी असावी, याचा विचार केला तर मारुती, टाटा आणि टोयोटा यांनी आजपर्यंत अनेक गाड्या लाँच केल्या. काही गाड्या मध्यमवर्गीय फॅमिलीच्या खास राहिल्या तर काही गाड्या डोकेदुखी ठरल्यात. पण टोयाटोची अशी एक ७ सीटर एमपीव्ही होऊन गेली त्या कारला आजही कुणी विसरू शकत नाही. आतमध्ये भरपूर स्पेस, एक काय दोन फॅमिली आरामात बसतील असे सीट्स आणि मायलेजमध्ये दमदार अशी टोयोटाने कार भारतीयांना गिफ्ट केली होती. या कारची क्रेझ इतकी होती की मारुती आणि टाटालाही मोठा धक्का बसला होता. या कारचं नाव आहे toyota qualis
advertisement
toyota qualis हे नुसतं नाव नव्हतं तर फॅमिली आणि ट्रव्हल्स व्यवसायामध्ये एक विश्वासाचं स्थान होतं. आजही ही गाडी ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती जपून ठेवली आहे. या कारचं इंजिन आणि आतलं इंटिरिअर हे आरामदायक असचं होतं. त्यामुळे ही कार अल्पावधीत हीट झाली. ही फॅमिली एसयूव्ही म्हणून बाजारात लाँच करण्यात आली होती. त्या वेळी महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टाटा सुमोसारख्या कारची कारची विक्री फारशी नव्हती. त्या कार तोट्यात होत्या. त्या वेळी दरवर्षी क्वालिसच्या एक लाख युनिट्सची विक्री होत असे. यावरून तिची लोकप्रियतेचा अंदाज तुम्हाला आला असेल.
advertisement
टोयोटाने ही कार बंद करण्यामागचं कारण खूप मनोरंजक आहे. टोयोटा क्वालिस 1994मध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच झाली होती. या कारमध्ये 2.4 लिटर 4 सिलिंडर डिझेल इंजिन होतं. या सात सीटर कारची किंमत त्यावेळी फक्त 4.6 लाख रुपये (एक्स शोरूम) होती. या कारचं इंजिन दमदार असल्याने शहरापासून ते गावापर्यंतच्या सर्व प्रकारच्या रस्त्यांवर चालवण्यास ती योग्य होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement