माझ्या मुलांपेक्षा सुंदर दिसतायेत! एकएक करत 4 चिमुकल्यांना संपवलं, 'किलर आई'ची दहशत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Killer Mother Killed Children : लग्न समारंभात सहा वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने हे प्रकरण सुरू झालं आणि प्रकरणाची चौकशी केल्यानंतर जुने खून उघड झाले.
advertisement
पानिपत जिल्ह्यातील हे प्रकरण. लग्न समारंभात सहा वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने हे प्रकरण सुरू झालं आणि प्रकरणाची चौकशी केल्यानंतर जुने खून उघड झाले. 1 डिसेंबर रोजी रात्री वरात निघणार असतानाच विधी नावाची 6 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. कुटुंबाने रात्रभर शोध घेतला पण ती काही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी विधीची आजी वरच्या मजल्यावर गेली आणि तिला दरवाजा बाहेरून बंद दिसला. दरवाजा उघडताच विधी टबमध्ये मृत आढळली.
advertisement
advertisement
पोलिसांनी लग्नात उपस्थित असलेल्या सर्वांची चौकशी केली. विधीची मावशी पूनमशी बोलताना पोलिसांना तिचं बोलणं संशयास्पद वाटलं. कठोरपणे विचारपूस केली असता, पूनमने रडत विधीच्या हत्येची कबुली दिली. इतकंच नव्हे तर तिने चार खून केल्याचंही सांगितलं. सर्वांची हत्या टब किंवा पाण्याच्या टाकीत बुडवून केली, यात तिच्या मुलाचाही समावेश होता.
advertisement
पूनमने सगळ्या आधी तिच्या वहिनीची 9 वर्षांची मुलगी इशिकाची हत्या गेली. भवर गावात ती पाण्याच्या टाकीत बुडाल्याची आढलली. इशिकाच्या हत्येनंतर पूनमने स्वतःचाच 3 वर्षांचा मुलगा शुभमचीही हत्या केली. त्याला इशिकाच्या हत्येबाबत माहिती असावं, या संशयातून तिने त्यालाही त्याच टाकीत बुडवून मारलं. त्यानंतर पूनम सिवाह गावी तिच्या माहेरी गेली, जिथं तिने तिच्या चुलत भावाची 6 वर्षांची मुलगी जियाला प्लॅस्टिक टबमध्ये बुडवून मारलं. हे सर्व मृत्यू अपघात म्हणून नोंदवण्यात आले होते.
advertisement
हत्येचं कारणही धक्कादायक आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पूनमने सांगितलं की तिला स्वतःच्या मुलांपेक्षा सुंदर वाटणाऱ्या मुलांचा राग येत होता. आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी आहे की तो पूर्णपणे गुन्हेगारी हेतूने हे खून करत होता याचाही पोलीस तपास करत आहेत. तिचा दुसरा मुलगा, जो चार वर्षांचा आहे, तो कुटुंबाच्या देखरेखीखाली आहे.
advertisement
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पानीपतचे पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं की, आरोपीने चारही खून केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा शास्त्रीय आणि मानसिकदृष्ट्या तपास केला जात आहे. पूनमला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथं तिला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं. ठोस पुरावे गोळा करण्यासाठी पोलिस आता प्रत्येक खून घटनेचा पुन्हा तपास करत आहेत. (सर्व फोटो प्रतीकात्मक : AI Generated)


