Ruperi Walut Song: अभिजीत-गौतमीच्या केमिस्ट्रीने सोशल मीडियावर लावली आग! कधी रिलीज होणार नवं गाणं? समोर आली तारीख
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Abhijeet Sawant-Gautami Patil: गौतमी आणि अभिजीत सावंत यांचे 'रुपेरी वाळूत' हे रोमँटिक गाणे अलिबागच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर चित्रित करण्यात आले आहे.
मुंबई: आपल्या नृत्याच्या ठेक्यावर तरुणाईला वेड लावणारी आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सक्रिय झालेली लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील आता एका मोठ्या प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती 'इंडियन आयडॉल' फेम गायक अभिजीत सावंतसोबत एका खास गाण्यात दिसणार आहे. या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली असून, खुद्द अभिजीत सावंतने या गाण्यामागची गोड गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
advertisement
गौतमी आणि अभिजीत सावंत यांचे 'रुपेरी वाळूत' हे गाणे ५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे रोमँटिक गाणे अलिबागच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात अभिजीत सावंतने केवळ गायनच नाही, तर गौतमीसोबत अभिनयही केला आहे. अभिजीतला गौतमीसोबत परफॉर्म करताना पाहणे चाहत्यांसाठी नक्कीच खास ठरणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
काही दिवसांपूर्वी गौतमीने अभिजीत सावंतसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यानंतरच चाहत्यांनी या दोघांचा एकत्र प्रोजेक्ट येणार असल्याचे अंदाज लावले. त्यानंतर या दोघांचा एक AI व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये अभिजीतने कॅप्शनमध्ये 'काहीतरी खास येत आहे' असे लिहिले होते, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
advertisement


