Best Action Film : हिरोचं डोकं फिरलं, 1 तास 48 मिनिटमध्ये संपवलं खलनायकाचं अख्खं कुटुंब, शेवट थरारक!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Best Action Film On OTT:तुम्हाला ॲक्शन फिल्म्सची आवड असेल तर आम्ही तुम्हाला एका दमदार, खतरकनाक ॲक्शन पॅक सिनेमाविषयी सांगणार आहोत. जेव्हा हिरोचं डोकं फिरतं आणि तो खलनायक आणि त्याचं संपूर्ण कुटुंब एकाच वेळी उध्वस्त करतो. 1 तास 46 मिनिटांचा हा चित्रपट ॲक्शनने भरलेला आहे.
advertisement
advertisement
advertisement
या चित्रपटाचे जवळपास संपूर्ण शूटिंग ट्रेनमध्ये झालं आहे. 'किल'ची कथा एनएसजी कमांडो अमृत राठोड (लक्ष्य) आणि तुलिका यांच्याभोवती फिरते. अमृत आणि तुलिका रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले. यादरम्यान तुलिकाचे संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत असते. मात्र काही वेळाने दरोडेखोरांची टोळीही त्याच ट्रेनमध्ये चढते.
advertisement
ट्रेन सुरू होताच सशस्त्र दरोडेखोर प्रवाशांची लूट सुरू करतात. चित्रपटात राघव जुयालने मुख्य खलनायकाची भूमिका साकारली असून ट्रेनमध्ये उपस्थित असलेले सर्व दरोडेखोर त्याच्या कुटुंबातील आहेत. राघवच्या भूमिकेचं नाव फानी आहे. तो विक्षिप्त प्रकारचा मुलगा आहे. त्याची नजर ट्रेनमध्ये तुलिकावर पडते आणि मग तो तिचा विनयभंग करू लागतो.
advertisement
advertisement










