'दादासाहेब फाळके' पुरस्कार घ्यायला गेले अन् पुन्हा परतलेच नाहीत, बॉलिवूडच्या 'ग्रेट शो मॅन'ची शॉकिंग EXIT

Last Updated:
Raj Kapoor Dadasaheb Phalke Award : राज कपूर यांना १९८८ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
1/9
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘ग्रेट शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांची कथा आजही अनेकांना प्रेरणा देते.

advertisement
2/9
त्यांनी फक्त अभिनयावरच नव्हे, तर त्यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनानेही एक मोठा ठसा उमटवला. पण, त्यांचा शेवट खूपच दुर्दैवी झाला, ज्यामुळे त्यांचे चाहते आजही हळहळतात.

3/9
राज कपूर यांना १९८८ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

4/9
२ मे १९८८ रोजी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यांची कन्या रीमा जैनने एका मुलाखतीत त्या दिवसाबद्दलचा एक दुर्दैवी किस्सा सांगितला होता.

5/9
रीमा जैन म्हणाल्या, “पापा ३० एप्रिलला मुंबईतून दिल्लीला गेले. जेव्हा त्यांचं विमान दिल्लीत उतरलं, तेव्हा बाहेर प्रचंड धुळीचं वादळ होतं. विमानाचा दरवाजा उघडताच, धुळीच्या वाऱ्याने त्यांचं स्वागत झालं. त्यांना दम्याचा आजार होता, त्यामुळे धुळीमुळे त्यांच्या फुफ्फुसांना खूप त्रास झाला.”

6/9
पुरस्कार सोहळ्यासाठी राज कपूर ऑक्सिजन सिलेंडरसह पोहोचले होते. रीमा म्हणाल्या, “ते खूप बेचैन होते. ते इतके अस्वस्थ होते की, आईचा हात खूप घट्ट पकडला होता. जेव्हा त्यांचं नाव पुकारलं गेलं, तेव्हा ते त्यांच्या जागेवरून उठूच शकले नाहीत.”

7/9
त्यांची ही अवस्था पाहून तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांनी प्रोटोकॉल मोडला आणि स्वतः स्टेजवरून खाली उतरून राज कपूर यांना पुरस्कार दिला.

8/9
रीमा पुढे म्हणाल्या, “पापांची अवस्था पाहून राष्ट्रपतींनी त्यांना माझ्या रुग्णवाहिकेतून घेऊन जाण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांचे शेवटचे दिवस खूप वेदनादायी होते.”

9/9
२ जून १९८८ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी राज कपूर यांचं निधन झालं. ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार घ्यायला दिल्लीला गेलेले राज कपूर पुन्हा परतलेच नाहीत.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement