"आयुष्याने सगळंच हिरावून घेतलं...", डिवोर्सनंतर सेलिना जेटलीची पहिली प्रतिक्रिया समोर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Celina Jaitly Post on Divorce : अभिनेत्री सेलिना जेटलीच्या आयुष्यात वादळ आलं आहे. घटस्फोटाबाबत अभिनेत्रीने पहिली पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटलीने आपला फॉरेनर पती पीटर हाग विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने आपल्या पतीविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. एखाद्या कामवाल्या बाईप्रमाणे पीटर वागवत असल्याचं सेलिना म्हणाली आहे. आता 12 डिसेंबर 2025 रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून अभिनेत्रीने आता याबाबत पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
advertisement
सेलिना जेटली गेल्या अनेक दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे अभिनेत्रीची भाऊ निवृत्त मेजर विक्रांत कुमार जेटली गेल्या वर्षभरापासून UAE च्या तुरुंगात आहे तर दुसरीकडे अभिनेत्रीचा पतीपासून छळ होत आहे. सेलिनाने आपला पती पीटर हागवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने आता पतीविरोधात घटस्फोटाची मागणी केली आहे. अशातच अभिनेत्रीने आता पोस्ट शेअर करत घटस्फोटाबद्दल मौन सोडलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सेलिना जेटलीने पुढे काही कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत. "आयुष्याने सर्व काही मागे घेतले, ज्यांवर मला विश्वास होता ते दूर गेले, ज्या वचनांवर मला श्रद्धा होती ती शांतपणे तुटली, पण वादळासमोर मी टिकले, त्याने मला वाचवले, त्याने मला वादळातून बाहेर काढलं, त्याने मला माझ्या आतल्या त्या स्त्रीला भेटण्यास भाग पाडले जी मृत्यूला नकार देते", अशा संदर्भातील या ओळी आहेत.
advertisement
सेलिनाने पुढे असेही म्हटले आहे की, ती एका सैनिकाची मुलगी आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीचा ती धैर्याने सामना करते. आता माझे हृदय तुटलं आहे. जेव्हा माझ्याशी अन्याय होतो तेव्हाच मी लढते. माझ्यासाठी माझ्या सैनिक भावासाठी लढणे, मुलांसाठी लढणे आणि माझ्या सन्मानासाठी लढणे गरजेचे आहे. माझ्याशी घडलेल्या सर्व घरगुती हिंसेविरुद्ध तक्रार दाखल केली गेली आहे".


