बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रीवर फिदा होता दाऊद इब्राहिम! अंडरवर्ल्डच्या भीतीने सोडला देश; आज जगतेय असं आयुष्य
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अनेकदा असं होतं की एखादा कलाकार एखाद्या हिट चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार बनतो, पण नंतर अचानकच गायब होतो. अशीच एक सुंदर अभिनेत्री होती जिच्यावर दाऊद इब्राहिमदेखील फिदा झाला होता. पण अंडरवर्ल्ड डॉनच्या पाठलागाने एका रात्रीत तिला गायब व्हावं लागलं होतं.
advertisement
advertisement
‘वीराना’ ही रामसे ब्रदर्स यांनी दिग्दर्शित केलेली एक लो-बजेट हॉरर फिल्म होती. फक्त 60 लाख रुपयांत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. तरीही, या चित्रपटाने तब्बल 1.5 कोटी रुपयांची कमाई केली आणि त्या काळातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या हॉरर चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटात जैस्मीनने एक रहस्यमय आणि भयावह महिलेची भूमिका साकारली होती.
advertisement
सौंदर्य आणि "मिल्की ब्यूटी" इमेजमुळे जैस्मीनला एक वेगळी ओळख मिळाली. फार कमी लोकांना माहिती आहे की जैस्मीनने वयाच्या 13 वर्षी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. ‘हातिम ताई’, ‘सरकारी मेहमान’ आणि ‘तलाक’सारख्या चित्रपटांमध्ये तिने छोट्या भूमिका साकारल्या होत्या. पण ‘वीराना’नंतर तिच्या करिअरला जणू पूर्णविरामच लागला. अभिनेत्री अचानक गायब झाली.
advertisement
जैस्मीन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिममुळे गायब झाली असल्याचं म्हटलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाऊद जैस्मीनवर फिदा होता. असं म्हणतात की ती जिथे-जिथे जायची, तिथे दाऊद किंवा त्याची माणसे पोहोचायचे. तिला महागड्या भेटवस्तू पाठवल्या जायच्या आणि सतत संपर्क साधण्याचे प्रयत्न होत होते. हे सगळं जैस्मीनला खूप अस्वस्थ करू लागलं. काही रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की तिला धमक्याही मिळू लागल्या होत्या. या सर्व गोष्टींचा सामना न करता आल्याने जैस्मीनने गायब होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
जैस्मीनच्या अचानक गायब होण्यामागे अनेक तर्कवितर्क लढवले जातात. काही लोकांचं म्हणणं आहे की तिने देश सोडला आहे, तर काहीजण असं मानतात की अंडरवर्ल्डच्या भीतीमुळे तिने स्वतःला समाजापासून पूर्णपणे दूर केलं आहे. ‘वीराना’मधील तिचे सहकलाकार हेमंत बिरजे यांनी एका मुलाखतीत दावा केला होता की जैस्मीन आता अमेरिकेत राहते आणि एक यशस्वी व्यावसायिका आहे.
advertisement