दीपिकाच्या हातातून निसटली 1000 कोटींची फिल्म, आणखी एका बिग प्रोजेक्टमधून हाकललं, पण कारण काय?

Last Updated:
Deepika Padukone : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिका पदुकोणला त्यांच्या चित्रपटातून काढून टाकलं होतं, आणि आता तिच्या हातातून एका मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल निसटला आहे.
1/7
मुंबई : बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोणला सध्या एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. नुकतंच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी तिला त्यांच्या चित्रपटातून काढून टाकलं होतं, आणि आता तिच्या हातातून एका मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल निसटला आहे.

advertisement
2/7
‘कल्कि २८९८ एडी’ या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमधून दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

3/7
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘कल्कि २८९८ एडी’ मध्ये दीपिकाने अमिताभ बच्चन आणि प्रभास यांच्यासोबत काम केलं होतं. चित्रपटाला प्रचंड यश मिळालं होतं आणि त्याने जगभरात १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.

4/7
या चित्रपटाचा सिक्वेल २०२७ मध्ये येणार आहे. पण, या सिक्वेलमध्ये दीपिका पदुकोण दिसणार नाही, हे आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. चित्रपटाची निर्मिती संस्था वैजयंती मुव्हीजने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल माहिती दिली आहे.

5/7
त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे, “हे अधिकृतपणे जाहीर करण्यात येत आहे की, ‘कल्कि २८९८ एडी’च्या आगामी सिक्वेलचा दीपिका पदुकोण भाग असणार नाही. खूप विचार केल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या चित्रपटासाठी एकत्र काम करूनही, आम्ही भागीदारी करू शकलो नाही.” त्यांनी असंही लिहिलं आहे की, ‘कल्कि’सारख्या मोठ्या चित्रपटाला मोठ्या समर्पणाची गरज असते.

6/7
काही दिवसांपूर्वीच संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटातूनही दीपिकाला काढून टाकण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका तिच्या कामाच्या वेळापत्रकाबाबत काही मागण्या करत होती, ज्यावर निर्मात्यांचं एकमत होत नव्हतं.

7/7
त्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली होती. आता दीपिकाला ‘कल्कि’च्या सिक्वेलमधून काढून टाकण्यात आलं आहे. तिच्या हातून एवढा मोठा चित्रपट गेल्याने तिच्या करिअरवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement