Dhanush : 14 फेब्रुवारीला South Star धनुष करणार लग्न? 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तब्बल 25 वर्षे सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या आणि आपल्या अभिनयाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकणाऱ्या या 'नॅशनल अवॉर्ड' विजेत्या अभिनेत्याच्या लग्नाची तारीख आणि जोडीदाराचे नाव सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आहे.
सिनेमा जगत आणि कलाकारांच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. विशेषतः जेव्हा एखाद्या सुपरस्टारच्या लग्नाची चर्चा रंगते, तेव्हा सोशल मीडियावर जणू वादळच येतं. सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एका अशाच दिग्गज अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची एक बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. तब्बल 25 वर्षे सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या आणि आपल्या अभिनयाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकणाऱ्या या 'नॅशनल अवॉर्ड' विजेत्या अभिनेत्याच्या लग्नाची तारीख आणि जोडीदाराचे नाव सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आहे.
advertisement
तब्बल 20 वर्षांचा संसार मोडल्यानंतर आणि कायदेशीर घटस्फोट घेतल्यानंतर हा अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. हा अभिनेता आहे साऊथ सुपस्टार धनुष. विशेष म्हणजे, ज्या अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले जात आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून सध्या बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने भुरळ घालणारी एक 'मराठमोळी' अभिनेत्री आहे आणि ही अभिनेत्री आहे मृणाल ठाकूर.
advertisement
काही महिन्यांपूर्वी मुंबईत एका चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी या दोघांना एकत्र पाहिले गेले होतं. यावेळी या धनुषने मृणालचा हात हातात धरला होता. दोघांमधील ती केमिस्ट्री आणि एकमेकांच्या कानात चाललेली कुजबुज कॅमेऱ्यात कैद झाली आणि तेव्हापासूनच त्यांच्या 'सिक्रेट' अफेअरच्या चर्चांना उधाण आले. इतकेच नाही तर, हा अभिनेता खास त्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी आणि तिला सपोर्ट करण्यासाठी मुंबईत आल्याचेही बोलले गेले. या दोघांच्या वयात साधारण 9 वर्षांचे अंतर आहे.
advertisement
14 फेब्रुवारी आणि लग्नाचा मुहूर्त?आता चर्चा अशी आहे की, हे 'कपल' येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर एका साध्या आणि खाजगी सोहळ्यात लग्नगाठ बांधणार आहे असं बोललं जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही किंवा कपलं याबद्दल काहीच वक्तव्य केलेलं नाही. पण मृणाल ठाकूर 'तेरे इश्क में' या धनुष आणि क्रिती सेननच्या सिनेमाच्या सक्सेस पार्टिमध्ये पोहोचली होती. या सिनेमामध्ये मृणाल ठाकूरनं अभिनय केला नाही तरी ती धनुषला सपोर्ट करण्यासाठी इथे पोहोचली त्यामुळे ते दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, असं बोललं जातंय. शिवाय मृणाल धनुषच्या दोन्ही बहिणींना इंस्टाग्रामवर फॉलो करते आणि त्याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे, यामुळे चाहत्यांच्या मनात शंका अधिकच गडद झाली आहे.
advertisement
advertisement
मृणालचा 'दो दीवाने शहर में' हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. अशा काळात प्रमोशन सोडून ती लग्नासाठी वेळ काढणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिने स्पष्ट केले होते की, "तो माझा फक्त एक चांगला मित्र आहे." तिने या चर्चांना निव्वळ 'अफवा' संबोधून पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. पण असे असले तरी, या अभिनेत्याकडून अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला खरंच सनई-चौघडे वाजणार की या केवळ अफवा ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.









