एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, तर कुणाला पोलिसांनीच उचललं; हिंदी शोलाही लाजवतील Bigg Boss Marathi च्या घरातील 'हे' कांड
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi Controversies: सध्या नवीन पर्वाची हवा सुरू असताना, जुन्या पर्वातील काही असे काही वाद पुन्हा चर्चेत आले आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर तेव्हा अक्षरशः आग लावली होती.
advertisement
advertisement
पहिल्या पर्वात अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील जवळीक चांगलीच चर्चेत राहिली होती. मात्र, वाद तेव्हा वाढला जेव्हा विवाहित असलेल्या राजेशने कॅमेरासमोर आपल्या पत्नीला उद्देशून चक्क कबुली दिली की, त्याचं रेशमवर प्रेम जडलंय. एका रिॲलिटी शोमध्ये आपल्या संसाराचा असा जाहीर लिलाव केलेला पाहून अख्खा महाराष्ट्र त्यावेळी खवळला होता.
advertisement
advertisement
बिग बॉसच्या इतिहासातील हा सर्वात धक्कादायक प्रसंग होता. दुसऱ्या पर्वात अभिजीत बिचुकले यांना चक्क सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या सेटवरून ताब्यात घेतलं होतं. चेक बाऊन्सच्या जुन्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई झाली होती. 'डॉन' म्हणून मिरवणाऱ्या बिचुकलेंना पोलिसांनी घरातून बाहेर नेल्याचं पाहून घरातील इतर सदस्यही हादरले होते.
advertisement
दुसऱ्या पर्वात अभिनेत्री शिवानी सुर्वे सुरुवातीपासूनच चर्चेत होती. पण घराबाहेर पडण्याची तिची वारंवार होणारी मागणी पाहून होस्ट महेश मांजरेकर यांचा पारा चढला. त्यांनी शिवानीला 'क्राय बेबी' (Crybaby) म्हणत कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता घराबाहेरचा रस्ता दाखवला होता. मांजरेकरांचा तो दरारा पाहून तेव्हा शिवानीची चांगलीच बोलती बंद झाली होती.
advertisement
दुसऱ्या पर्वात 'टिकेल तो टिकेल' या टास्कदरम्यान परागने रागाच्या भरात नेहाच्या कानशीलात लगावली होती. तसेच तिच्यासोबत गैरवर्तनही केले होते. 'टिकेल तो टिकेल' या टास्क दरम्यान, नेहा शितोळे आणि वैशाली यांनी परागला सिंहासनावरून उतरवण्यासाठी त्यांच्या शारीरिक शक्तीचा वापर केला. परागने नेहा आणि वैशालीला ढकलण्यापासून रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण शेवटी तो पडला. यावेळी परागचा संयम सुटला आणि त्याने नेहाला थप्पड मारली.
advertisement
तिसऱ्या पर्वात विशाल आणि सोनालीच्या मैत्रीत अशी काही मिठाचा खडा पडला की त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. विशालने सोनालीवर असा आरोप केला की, ती मुद्दाम त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेय. प्रकरण इथेच थांबलं नाही, तर विशालने सोनालीच्या वैयक्तिक सवयींवरून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. इतकंच नाही, तर त्याने तिच्यावर ड्रग्जचे आरोप देखील केले होते, ज्याचा सोशल मीडियावर मोठा निषेध झाला होता.
advertisement
advertisement
पाचव्या पर्वात एका एपिसोडमध्ये आर्या जाधव व निक्की यांच्यामध्ये वाद झाले. यावेळी आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. हा प्रकार एका टास्कदरम्यान घडला आहे. वर्षाताई एका हिऱ्यावर लक्ष ठेवत असतात तेव्हा जान्हवी व आर्या हे सुद्धा त्यांना मदत करत असतात. त्यावेळेला निक्की मुद्दाम त्यांच्यामध्ये येते आणि त्यांना अडवून दाखवते. त्यावेळेला आर्याचा पारा चढतो आणि आर्या व निक्कीमध्ये बाचाबाची होते. निक्की मुद्दाम खोटेपणा करत असल्याचे पाहत आर्या तिला पकडते आणि तिच्या सणसणीत कानाखाली लगावते.








