जगातील सर्वात जास्त चोरी होणारी वस्तू कोणती? लिस्टमध्ये ना सोनं आहे ना पैसे, उत्तर ऐकून डोकं चक्रावेल

Last Updated:
Most stolen item in the World : जगातील सर्वात जास्त चोरी होणारी वस्तू सोनं-चांदी नसून आपल्या रोजच्या खाण्यापिण्याशी संबंधित एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. हे वाचून कदाचित तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, पण हे वास्तव आहे.
1/6
दैनंदिन जीवनात आपण जेव्हा कधी 'चोरी' हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येते? साहजिकच, सोन्याचे दागिने, कपाटातील रोकड किंवा एखादी महागडी आलिशान गाडी. कारण आपल्याला वाटते की चोर फक्त त्याच गोष्टींवर हात साफ करतात ज्यांची किंमत लाखाोंमध्ये असते. पण तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात जास्त चोरी होणारी वस्तू सोनं-चांदी नसून आपल्या रोजच्या खाण्यापिण्याशी संबंधित एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. हे वाचून कदाचित तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, पण हे वास्तव आहे.

advertisement
2/6
एकेकाळी चोरी म्हटलं की फक्त बँका किंवा घरे फोडली जायची. मात्र, आता काळ बदलला आहे. आता चोरट्यांचा मोर्चा सुपरमार्केट, मोठमोठे मॉल्स आणि रिटेल स्टोअर्सकडे वळला आहे. सुरक्षिततेच्या कडक वेढ्यातून दागिने चोरण्यापेक्षा, अशा ठिकाणांहून सहज उपलब्ध होणाऱ्या आणि पटकन विकल्या जाणाऱ्या वस्तू चोरण्याकडे कल वाढला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध सर्वेक्षणांनुसार, या छोट्या वाटणाऱ्या चोरीमुळे व्यापाऱ्यांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.

3/6
आता तुमच्या मनातील उत्सुकता ताणली गेली असेल की, नक्की ती वस्तू कोणती? आंतरराष्ट्रीय रिटेल सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार, जगात सर्वात जास्त चोरी होणारी वस्तू म्हणजे 'चीज' (Cheese) होय.
आता तुमच्या मनातील उत्सुकता वाढली असेल की, नक्की ती वस्तू कोणती? आंतरराष्ट्रीय रिटेल सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार, जगात सर्वात जास्त चोरी होणारी वस्तू म्हणजे 'चीज' (Cheese) होय.
advertisement
4/6
हो, तुम्ही बरोबर वाचलंत, युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुपरमार्केटमधून दरवर्षी लाखो टन चीज चोरीला जाते. चीज हे जागतिक स्तरावर चोरीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. हे ऐकून कोणाचेही डोके चक्रावून जाईल, पण त्यामागे काही ठोस कारणे आहेत.

5/6
का होतेय 'चीज'ची इतकी चोरी?खवय्यांच्या जगात चीजला मोठी मागणी आहे, पण चोरी होण्यामागे केवळ चव हे कारण नाही:
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार चीजची किंमत बरीच जास्त असते.
चीजचे पाकीट आकाराने लहान असते, ज्यामुळे ते कपड्यांमध्ये किंवा बॅगेत लपवणे सोपे जाते.
चीजला जगभर मागणी असल्याने, चोरलेले चीज काळ्या बाजारात किंवा छोट्या रेस्टॉरंट्सना सहज विकता येते.
का होतेय 'चीज'ची इतकी चोरी?खवय्यांच्या जगात चीजला मोठी मागणी आहे, पण चोरी होण्यामागे केवळ चव हे कारण नाही:आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार चीजची किंमत बरीच जास्त असते.चीजचे पाकीट आकाराने लहान असते, ज्यामुळे ते कपड्यांमध्ये किंवा बॅगेत लपवणे सोपे जाते.चीजला जगभर मागणी असल्याने, चोरलेले चीज काळ्या बाजारात किंवा छोट्या रेस्टॉरंट्सना सहज विकता येते.
advertisement
6/6
इतर चोरी होणाऱ्या वस्तूंची यादीकेवळ चीजच नाही, तर इतरही काही अनपेक्षित वस्तू चोरट्यांच्या पसंतीस उतरतात. चीज नंतर जगात सर्वात जास्त चोरी होणाऱ्या वस्तूंमध्ये चॉकलेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल महागडी दारू (Alcohol), सौंदर्य प्रसाधने (Cosmetics) आणि परफ्युम यांचा क्रमांक लागतो. या वस्तू आकाराने लहान पण किमतीने महाग असल्याने सुपरमार्केटसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement